मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, January 24, 2022

भारत माझा...

 भारत माझा


भारत माझा,

मी भारताचा आहे

शूरशिपाई मी

भारत देशाचा आहे...!!


भारत माझा

माझा अभिमान आहे

भारत माझा

जीव की प्राण आहे....!!


तिरंगा माझा

भारताची शान आहे

जन गण मन हे

राष्ट्राचे गाण आहे....!!


सत्यमेव जयते

वंदे मातरम्

भारत माझा

सुजलाम सुफलाम...!!


भारताची संस्कृती

थोर संत, परंपरा

जगात वेगळी आहे

इथली विचारधारा....!!


कणाकणात भिनतो

 सांगतो साहस, शौर्य

क्रांतिवीर झाले अनेक

भारत प्राणाहूनी प्रिय....!!


कृषीप्रधान देश माझा


मला अभिमान आहे

भारत देश माझा

माझी खरी शान आहे....!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम




Friday, July 23, 2021

जीवनातला खरा आनंद...

 *जिवनातला खरा आनंद*


जिवनातला खरा आनंद

फक्त शोधता आलं पाहिजे

स्वतःला चांगल्या कामात

गुंतता आलं पाहिजे....!!


निराधाराला आधार देवून

माणसात देव शोधता आलं पाहिजे

वृद्धांवर जिवापाड प्रेम करून

त्यांना हळुवार जपता आलं पाहिजे.....!!


दानधर्म, निस्वार्थ सेवावृत्ती

मनापासून असली पाहिजे

वरवरच्या दिखाऊपणाला

थोडं बाजूला सारता आलं पाहिजे...!!


उन्हाळे, पावसाळे येतच राहतात

निसर्गावर भरभरून प्रेम करता आलं पाहिजे

मातीतच जन्मून मातीतच जायचं

हे लक्षात ठेवता आलं पाहिजे...!!


माय आणि माती अनमोल जीवनी

तीचं थोडंफार ॠण फेडता आलं पाहिजे

आकाशात कितीही उंच उडा पण

पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.....!!


चारचौघांतल्या मोठमोठ्या गप्पापेक्षा

चारचौघांच्या हृदयात बसता आलं पाहिजे

मोठेपणाला बाजूला सारून

एकमेकांच्या संकटात धावता आलं पाहिजे...!!


जीवनात भरभरून आनंद आहे

तो फक्त शोधता आलं पाहिजे

सुखदुःखाच्या वाटा तुडवीत

पुढे पुढे जाता आलं पाहिजे....!!


*©️®️कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पाऊसधारा...हायकू रचना

 *हायकू रचना*


*विषय- पाऊसधारा*


पाऊसधारा💦💦

गार गार गारवा

ॠतू हिरवा....!!


पाऊसधारा

बळी तो सुखावला

आनंद झाला....!!😊😉


वसुंधरेने

हिरवा शालू नेसे

स्वर्गच जैसे....!!


धरा नटली🌿🌱🌱

नाचे मनपाखरू

कशी आवरू.....!!


पाऊसधारा

झेली गार तो वारा

या जलधारा....!!💦


वीज दरारा⚡💥

लख्ख प्रकाश सारा

पाऊसधारा....!!


रान हिरवे

तरू🌳 हिरवेगार

पाऊसमार....!!


चातक 🐦 पक्षी

प्रतिक्षा हो संपली

तृष्णा भागली...!!


*©️®️कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...