मानवी मनाला अस्वस्थ करून वाचनाचा वेग वाढवणारी कादंबरी म्हणजे -काडीमोडातील काटे
विदर्भातले वाशिम जिल्ह्यातील बोरखडी गावचे हल्ली छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक भ. पु. कालवे सर यांची पहिली कादंबरी 'घट रिकामा' वाचल्यानंतर पुढील कादंबरी वाचनाची उत्सुकता वाचनाचा वेग वाढवणारी प्रतीक्षेत असलेली 'काडीमोडातील काटे' ही दुसरी कादंबरी नुकतीच वाचनात आली. घट रिकामा या कादंबरीचा दुसरा भाग म्हणजे 'काडीमोडातील काटे' ही कादंबरी होय. एका सरळ मार्गे प्राध्यापक असलेल्या शिक्षकाला जीवन जगताना त्यांचा संघर्ष, होणारी ससेहोलपट, चारचौघात जीवन जगताना येणारी आव्हाने, प्रत्येक आव्हानांना तोंड देताना मेताकुटीला येणारा जीव, नोकरी करणाऱ्यांचे कसे हाल होतात? समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, मित्रांनी दिलेली साथ आणि आपल्याच नातेवाईकांनी केलेला घात या सगळ्यांची उकल करणारी, वाचनाचा वेग वाढवणारी व मानवी जीवनाला अस्वस्थ करून विचार करायला लावणारी कादंबरी म्हणजे 'काडीमोडातील काटे' होय.
प्राध्यापक अशोक व त्याची बायको उर्मिला यांच्या संसाराचा न बसलेला ताळमेळ, परिस्थितीशी दोन हात न करण्याचा अट्टाहास, आपापल्या पात्रामध्ये ठामेठोकपणे राहणारी पात्र, समयाशी जुळवा जुळव न करता येणारं जोडपं, त्यामध्ये त्या चिमुकल्या बाळाची होणारी परवड वाचताना माणूस म्हणून विलक्षण अस्वस्थ होतो.
काडीमोडातील काटे वाचताना अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. वाचकाची उत्सुकता मात्र शेवटपर्यंत टिकून राहते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्राध्यापक अशोक यांना सात वर्षात ९ वेळा घरं बदलावी लागतात. त्यामुळे वैतागून गेलेला अशोक शेवटी स्वतःच्या घरासाठी पैशाची जुळवाजुळ करून शेवटी स्वतःच्या घरात राहायला जातो. त्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागते पण नवीन घरांमध्ये सुद्धा अशोक व उर्मिलाचे वाद कांहीं थांबत नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचे रोज वाद होत. कित्येक वेळा ते वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे प्राध्यापक आशोकने उर्मिला पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जुडीसीएल सेपरेशन साठी अॅड . विजय मोठे यांच्याकडे जाऊन घटस्फोटाची केस दाखल करतात त्यामुळे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय प्राध्यापक आशोक घेताना एखाद्या अग्नि कुंडात होरपळल्यासारखा अनुभव घेतात. छोट्या बाल सुकन्येला सोडून जाताना एका बापाची होणारी तळमळ या कादंबरीतून दिसून येते. नवरा बायकोच्या संसारी घरगुती भांडणाची ही झालेली सुरुवात शेवटी कोर्टकचेरीत पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामध्ये उर्मिलाचे बाळाला बाथरूम मध्ये कोंडणे, घटस्फोट नको म्हणून अंगावर रॉकेल ओतून घेणं, सतत घरात भांडण करणं आणि दोघांनीही पोटच्या गोळ्याचा म्हणजे त्या चिमुकलीचा विचार न करणं हे सगळं आधाशा सारखं वाटतं. एक माणूस म्हणून विचार न करणारे हे जोडपं वाचकाला मात्र नक्कीच विचार करायला लावतो.
चार भिंतीच्या आतलं भांडण हे कोर्टात गेलं होतं. उर्मिला आणि अशोकच भांडण खूप पुढे गेलं होतं. त्यांना कशाचीही तमा राहिली नव्हती. राजाराणीसारखं सुखाचा संसार करणारे पती-पत्नीचे प्रेम नावालाही शिल्लक राहिले नव्हतं. अशा परिस्थितीमध्येही अशोकला आशा होती की आपण एकदा उर्मिलाचा पिच्छाच सोडून टाकावा आता एकत्र राहण्यात मज्जा नाही. मनाने दुभंगलेली ही दोन जीवं तिसऱ्या जीवाचा पण विचार करायला तयार होत नव्हती. शिक्षकी पेशातल्या प्राध्यापकाला इतक्या कोर्टकचेऱ्या, कोणत्या नातेवाईकाची करावी लागली विनंती, झालेला त्रास, लागलेला पैसा आणि वाया गेलेला वेळ व वाढलेला डोक्याचा ताण अगदी मन विषन्न करतं या संपूर्ण प्रक्रियेत काडीमोड करण्यासाठी मनाभावापासून सामील असणारे दुलंगे सर, चिंचाणे सर , डॉक्टर श्रीधर हिंगे, तहसीलदार पाटील साहेब, सरपंच शामरा गावंडे, ए.पी.आय वाळवे, कॉन्स्टेबल साखळे, अॅडवोकेट गवशे, अॅडवोकेट रावराणे, अॅडवोकेट लाखोबा लोखंडे, साखळी अॅडव्होकेट गवशे , अॅंडवोकेट रावराणे, अॅडवोकेट पाल्हेटकर , अॅडवोकेट हातने , एएसआय खानापुरे, इंजिनियर कोराने साहेब , अॅडव्होकेट ट आर्वीकर, अॅवोकेट देव उमरखेडकर , अॅडव्होकेट.केट बारणे, एडवोकेट गजाणे तसेच उर्मिलाची वडील आणि उर्मिलाची मैत्रीण राज्यांमध्ये हावरे हे सर्व यामध्ये प्रमुख भूमिका निभावतात या सगळ्या प्रकारात अशोकला फाडून खाणारे पोलीस , प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जण पैसेच मागत होता. कुत्र्यांना एक एक तुकडा टाकावा तसं प्रत्येक पोलिसांना वेगळे पैसे आणि वकिलांची वेगळी फेज त्यामध्ये होणारा मनस्ताप यानेच अशोक चक्राहून गेला होता . कधी एकदा काडीमोड होईल यास प्रतिक्षित राहणारा अशोक फार उदासीन होता या सगळ्या तानात पोलिसांनी मागितलेली पार्टी टेबलाखालून मागितलेली रक्कम आणि पावलो पावलाला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी लुबडणारे पोलीस आणि वकील यांच्यामध्ये हतबल झालेला अशोक मात्र हरवून गेला होता.
एकंदरीत शिक्षकेपेक्षा असणाऱ्या अशोकला जेवढी सुज्ञ, सुशिक्षित , सुसंस्कारित पत्नी मिळायला हवी होती ती मिळालीच नाही.गुण सुरुवातीला उर्मिलाने दिलेल्या चार कवितेमुळे अशोकला समजल्यास नाहीत म्हणून कुणाच्या कवितेवरून त्याची मूळता विचार सुसंस्करित असतीलच असे नाही काडीमोडातील काटे या कादंबरीला असेच इतका गहन प्राध्यापक व पुकालवे यांनी मांडला आहे की शेवटी काय झालं असेल अशी उत्सुकता वाचकाला लागून राहते त्यामुळे कादंबरीवर वाचनाचा वेग आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही . शेवटी गाडी मोडं होऊन नकारात्मक तिकडेच कडून सकारात्मक तिकडे भरपूर कालवे यांनी हा प्रवास अगदी सोयीस्कर रित्या आपल्या लेखन शैलीने या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे प्रत्येक वाचकाला अतुन अस्वस्थ करणारे, कादंबरी वाचकाला वेड लावते सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच ही कादंबरी प्राध्यापक भ.पु. कालवे यांना
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
कादंबरी - काडीमोडातील काटे
लेखक -भ. पु. कालवे
प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन
पहिली आवृत्ती ३ नोव्हेंबर 2024
पुस्तक मागविण्यासाठी फोन नंबर- 7263975516
समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
(महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने पुरस्कृत)
तालुका जिल्हा वाशिम
Mob.- 9767663257