मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, March 19, 2024

संशयीवृत्ती एक मानसिक रोग(वैचारिक लेख)

 *संशयवृत्ती एक मानसिक रोग*

आज आपण समाजात पाहतो प्रत्येक रोगांवर औषध आहे ईलाज आहे पण आज पर्यंत संशयावर कोणताही इलाज नाही. उपचार नाही. औषध नाही. जुनी लोकं म्हणतातच ना की संशयी स्वभावाला औषध नाही. कोणाच्या सांगण्यावरून कुणाचा स्वभाव बदलत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा. कुणाचा प्रेमळ, कुणाचा तांमसी, कुणाचा हेकड, तर कुणाचा स्वार्थी, कुणाचा कंजूशी, कुणाचा साधाभोळा तर कोणाचा रागीट,  कुणाचा संशयी तर कुणाचा मतलबी पण स्वभावाला औषध अजून तर जगात सापडले नाही. हेही तितकच खरं.
         आजकाल नवरा बायकोच्या नात्यांमध्ये संशय खूप बळावत चाललेला आहे. या संशयी स्वभावामुळेच अनेकांचे संसार उध्वस्त होत असताना आपण पाहतो कित्येकांचे गैरसमज होऊन घटस्फोट होत असतात. लग्न होऊन दोन-तीन वर्ष झाले नाही की संशय बळावत जाऊन नवरा बायकोमध्ये भांडण होतात.भांडण इतके विकोपाला जातात की नवरा बायको एकमेकांचे तोंड पण पाहू शकत नाहीत. कारण नसताना जर नवरा बायकोने एकमेकावर संशय घेतला तर मग त्यांना  घटस्फोटापासून कोणीच वाचू शकत नाही. एखाद्या बाईने दुसऱ्या पुरुषाला हसून बोललं किंवा एखाद्या पुरुषाने दुसऱ्या स्त्रीला असून बोललो किंवा तिचं कौतुक केलं किंवा एखादी मदत केली की झालं लगेचच गैरसमज करून संशय बळावत जातो. संशय बळावत जाण्यामागे मूळ गैरसमजच आहे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतलं तर गैरसमजाला जागा राहत नाही. गैरसमज करून घेणं आजकालच्या पिढीतला दुर्धर आजारच झाला आहे. संशय घेणे मानसिक रोगच. नवरा बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकांवर अफाट विश्वास असायला हवा. नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर फुलत असतं, डुलत असतं.विश्वास नसला की विश्वासाची जागा गैरसमज घेऊन टाकतो आणि गैरसमजातून संशयी वृत्ती बळावत जाते.त्यातूनच घटस्फोट सारखा प्रकार पुढे येताना दिसतो. जर घटस्फोट झाला तर ज्यांचा काहीच दोष नाही अशा बिचा-या लेकरांना मायबापाच्या प्रेमापासून वंचित राहावं लागतं. बिचा-या लेकरांना त्यांचा दोष नसताना शिक्षा भोगावी लागते. शेवटपर्यंत कुणाच्या तर आई किंवा वडिलांच्या प्रेमाला मुकावे लागते. याचा विचार कधी करणार आहेत हे लोकं? छोट्या-छोट्या मुलांना आई सोडून जाते किंवा सोबत घेऊन जाते त्या पुरुषाचे दुसरे लग्न होते. त्याची दुसरी बायको त्या मुलांना नीट पहात नाही. जी चूक त्या मुलांनी केलेलीच नसते त्याची शिक्षा त्या मुलांना आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून नात्यांमध्ये गोडवा हवा. विश्वास हवा एकमेकावरचं अतूट प्रेम हवं.
        मागे वृत्तपत्रात एक बातमी वाचली की एका महिलेने नवऱ्याचा दुसऱ्या बाईसोबत प्रेम प्रकरण आहे अशा संशयातून पतीचाच खून केला तर दुसऱ्या पेपरमध्ये संशयावरून पत्नीने केली बायकोची हत्या. कुठे चाललाय आपला देश? कुठे चाललीय आपली संस्कृती ? पूर्वीच्या बायका नवऱ्याला पती परमेश्वर मानत असत. इतका आदर होता आजच्या काळातल्या बायका तर नवऱ्यावर त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मोठी गदा आणत आहेत. माझा नवरा कुण्या बाईला बोलला नाही पाहिजे,आईला बोलला नाही पाहिजे, बहिणीला बोलला नाही पाहिजे, फक्त मलाच राणी बनवून डोक्यावर चढवून बसला पाहिजे. असे अनेक कौटुंबिक वाद आपण आजूबाजूला पाहत असतो. मला तर नवलच वाटतं.पत्नीपीडित पुरुषांची संस्था बघून असं पूर्वी कधी ऐकायला बघायला मिळालं नव्हतं. हे पुरुषाकडून स्त्रियांना त्रास झालेल्या बातम्या कित्येकदा आपण वाचतो पण पत्नीपीडित पुरुषांची संस्था येथे ज्यांना ज्यांना बायका कडून त्रास होत होता.त्यांची मदत केली जाते.कोर्टामार्फत किंवा समुपदेशनाचे त्यांचे उद्बोधन केलं जातं. आजकाल कितीतरी घटस्फोटांचे अनेक प्रकरण पोलीस स्टेशनला महिला समुपदेशन केंद्रामार्फत नवरा बायकोला दोघांनाही समोर बसून त्यांचा समुपदेशन मार्गदर्शन केले जातं.घटस्फोट घेण्यापासून त्यांना वाचवलं जातं. किती प्रकरण मिटतात. काही मिटतच नसतात. तिथे घटस्फोट हा शेवटचा पर्याय असतो. या सगळ्या गोष्टींना एकमेव कारणीभूत आहे तो म्हणजे माणसाचा स्वभाव. कुठल्याही नात्यांमध्ये थोडंसं अॅडजेस्ट केलं की नातं छान टिकतं कुणीतरी माघार घ्यावी लागते. कुणीतरी समजून घ्यावं लागतं. संशय वृत्ती वाढीस लागू न देण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण आहे आपले संस्कार जे माणसाला विचलित होऊ देत नाहीत. चांगल्या संस्कारात वाढलेले लेकरं पुढे जाऊन चांगलीच वागत असतात. म्हणून लहान मुलांवर योग्य त्या वयातच चांगले संस्कार घडत असतात.लहान वयाच्या मुलांनी आई-वडिलांची भांडण ऐकलेली  असतात त्याचा परिणाम ती मूलं चिडचिडी बनतात. पुढे चालून ती ही भांडखोर वृत्तीची बनतात. याला काही अपवाद असू शकतात पण 'पेराल तसे उगवते' या म्हणीप्रमाणे लहान संस्कारक्षम वयात चांगले संस्कार, नम्रता, सहकार्याची वृत्ती, श्रद्धा, विश्वास, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध, निष्ठा, तत्त्वज्ञान, चिकित्सकवृती,व्यवहार ज्ञान, वेळेचा सदुपयोग, थोरामोठ्यांचा आदर, असे कितीतरी संस्कार पेरावे लागतात. असं नाही की ती थैली घेऊन बाजारात जाऊन ती विकत घेऊन यावे लागतात. संस्कार विकत घेऊन  येण्याची गोष्ट  नाही. सुसंस्कृत सुसंस्कारित मुले तेंव्हाच घडतात ज्यांच्या आई-वडिलांचे संस्कार चांगले असतात. आई-वडिलांचे संस्कार चांगले नसतील तर मग किती संस्काराचे डोस पाजले तरी काही उपयोग नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे आपण चांगले तर आपले अपत्य पण चांगलेच निघणार यात तिळमात्र  शंका नाही.

           अरे संशय संशय 
           कसा बळावत जातो 
            करून घराचा धिंगाणा 
             हळूच घरात येतो....

             अरे संशय संशय 
              कशी नाती दुरावती 
              फूट पाढून दोघांत 
              ज्ञघटस्फोटाने जागा घेती....

       संशयीवृत्ती हा मानसिक आजार आहे. असा अनेक तज्ञांच्या मते सिद्ध झाला आहे. जिथे संशयाला पालवी फुटते तिथे घराची बरबादी सुरू होते. वेळीच स्वतःला आवरा आणि संशयाचा चष्मा वेळीच दूर फेका तरच ख-या अर्थानं जीवन सुंदर होईल... आयुष्य खूप सुंदर आहे.फक्त ते छान जगता आलं पाहिजे.

लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोकलगाव...

Wednesday, March 13, 2024

बहीण त्याला कळली नाही...

 


*बहीण त्याला कळली नाही*


नम्रपणे बोलण्या जीभ त्याची वळली नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!


संकटावर मात करण्या उभी राहिली सदैव

हातात घालून हात संकटे पेलत राहीली सदा

खंबीरपणे उभी स्वतः क्षणभरही ढळली नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!


संघर्षमय जीवन जगत राहीली सदा

झगडत राहीली वाघीण सतत परिस्थितीशी

बिकट परिस्थितीत कधीच ती पळली नाही 

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!


आईसारखीच माया तिची तुझ्याचसाठी 

धूर तुझ्या डोळ्यांत साठला कसला काय माहिती?

मागता क्षणी देत राहीली कधी कुणावर जळली नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!


ज्याला कळली बहीण तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला

ज्याला कळली बहीण तो सुभद्रेचा कृष्ण झाला

देवकीचे प्रेम मात्र कंसास कधी वळले नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!


मोह,माया,गर्व, अहंकार काय घेऊन बसलास

मरणासन्न त्या आत्म्याला पुन्हा मारत बसलास

एवढी तिची शालिनता कधी मळली नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही...!!


नाही राहीली भार कुणावर बनली स्वावलंबी

अक्कलहुशारी,अन पुण्य पाठीशी घेऊन

सोबतीला मायबापांचे आशिर्वादाने राहीली

स्वकष्टावर जगली  सदा, कुणा ती भाळली नाही

जीव लावणारी बहीण त्याला कळली नाही....!!


माझे माझे म्हणत गेली,आले संकटे झेलत गेली

माहिती होते कुणी नाही कुणाचे वेड्या तरी

मन मारून जगत राहीली अपेक्षा ना कुणाची

मातापित्यानंतर कधी कुणा ती सळली नाही...!!

जीव लावणारी लाखात एक,एकुलती एक 

बहिण त्याला कळली नाही...!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

ता.जि.वाशिम.

Saturday, March 9, 2024

सरकारी शाळा...नका बंद करू...

 

सरकारी शाळा..नका बंद करू...


एकेक शाळा बंद करण्याचा

कुटील डाव इथं चालू आहे

घाणेरडं राजकारण आणि

सत्तापिपासू नेता दलबदलू आहे.


लोकशाहीचा केंव्हाच यांनी

बारा वाजविली आहे

न्याय,समता,समानता फक्त

कागदावरच गाजविली आहे....


सरकारी शाळा कायमच्या बंद

त्यामुळे गोरगरिबांचे होणार हाल

सगळे कसे शांत बसलेले आहेत

अदानी,खदानी,अंबानी मालामाल...


उठा जन हो ! उठा लोकं हो !

आतातरी उघडा तुमचे डोळे

नंतर  पश्चात्ताप करून काय उपयोग

इतके ही तुम्ही राहू नका भोळे...


गावोगावी काढा मोर्चे

लिहून पाठवा मंत्र्यांना पत्र

नाहीतर महिला उतरू रस्त्यावर

बंद करा तुमचे मनमानी सत्र...


पहिले चहा विकला म्हणून

आता शाळा विकायच्या का?

थोर क्रांतिकारकांचं बलिदान

असं व्यर्थ जाऊ द्यायचं का?


तुम्ही म्हणाल ती पुर्व दिशा 

म्हणून नेते विकत घ्यायचे का?

अहो चहा विकला म्हणून

कुठे देश विकायचा असतो का?


वाढली सत्ता ,घुसखोरी म्हणून

इतकं स्वार्थी व्हायचं असतं का?

नका करू बंद गरिबांच्या शाळा

चाललंय म्हणून काहीही करायचं असतं का?..


मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

ता.जि.वाशिम.

Thursday, March 7, 2024

मिनूच्या कविता...: तूच आहेस नारी...(मुक्त छंद काव्य)८ जागतिक महिला दि...

मिनूच्या कविता...: तूच आहेस नारी...(मुक्त छंद काव्य)८ जागतिक महिला दि...: *८मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (मिनाक्षी पांडुरंग नागराळे)* तूच आहेस नारी.... (मुक्तछंद काव्य) कोण काय म्हणतंय? लक्षच देऊ नक...

तूच आहेस नारी...(मुक्त छंद काव्य)८ जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

*८मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (मिनाक्षी पांडुरंग नागराळे)*

तूच आहेस नारी.... (मुक्तछंद काव्य)

कोण काय म्हणतंय?
लक्षच देऊ नकोस
मस्त रहा...अगदी बिनधास्त जग
जगून घे मनसोक्त
बुरसटलेल्या विचारांना
फाटा देऊन
टाक सखे पुढचं पाऊल
कितीही चांगले वागलीस
तरीही नांवच ठेवत राहतील 
पुढं नाहीतर मागं बोभाटा करतील
द्यावी लागेल तुला प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा
पुर्वीही होती आणि आजही आहे
फक्त बदललंय थोडं स्वरूप...
स्त्री म्हणजे अबला...
उपभोगाची वस्तू असंच काही...
पण तू रहा खंबीर....
घे जिजाऊचं धैर्य आणि धाडस..
आहिल्याचा करारी बाणा....
राणी झलकारीची चपळाई...
झुगारून दे वाईट रूढी परंपरा...
कल्पना चावलाचं बळ घे...
स्नेहा कोकणेताई पाटील यांची ताकद घे
सावित्रीची बुध्दी घे...
बघ जमतंय का तुला?
लाथाडून दे अन्यायाला
प्रतिकार करत जा अंधश्रद्धेला
मानवतेचा स्विकार करीत जा...
माणसातला माणूस ओळखायला शिक
स्पर्धेच्या युगात टिकायला शिक
यशाची शिखरं बिनधास्त गाठ
त्यासाठी बांध मनाशी खूणगाठ...
तुच आहेस सबला...
तूच आहेस शक्ती, भक्ती
तूच आहेस तुझी स्त्री मुक्ती....
कवेत घे आकाश
तूच आहेस गं नारी
उद्याचा धगधगता प्रकाश....!
तूच आहेस जाज्वल्य इतिहास
तूच आहेस देशाचा मान
घराचा अभिमान...
देशाची शान....
नारी तुझा सम्मान....!!


कवयित्री
 मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव


तूच आहेस नारी...(जागतिक महिला दिनानिमित्त मुक्तछंद काव्य)

*८मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (मिनाक्षी पांडुरंग नागराळे)*

तूच आहेस नारी.... (मुक्तछंद काव्य)

कोण काय म्हणतंय?
लक्षच देऊ नकोस
मस्त रहा...अगदी बिनधास्त जग
जगून घे मनसोक्त
बुरसटलेल्या विचारांना
फाटा देऊन
टाक सखे पुढचं पाऊल
कितीही चांगले वागलीस
तरीही नांवच ठेवत राहतील 
पुढं नाहीतर मागं बोभाटा करतील
द्यावी लागेल तुला प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा
पुर्वीही होती आणि आजही आहे
फक्त बदललंय थोडं स्वरूप...
स्त्री म्हणजे अबला...
उपभोगाची वस्तू असंच काही...
पण तू रहा खंबीर....
घे जिजाऊचं धैर्य आणि धाडस..
आहिल्याचा करारी बाणा....
राणी झलकारीची चपळाई...
झुगारून दे वाईट रूढी परंपरा...
कल्पना चावलाचं बळ घे...
स्नेहा कोकणेताई पाटील यांची ताकद घे
सावित्रीची बुध्दी घे...
बघ जमतंय का तुला?
लाथाडून दे अन्यायाला
प्रतिकार करत जा अंधश्रद्धेला
मानवतेचा स्विकार करीत जा...
माणसातला माणूस ओळखायला शिक
स्पर्धेच्या युगात टिकायला शिक
यशाची शिखरं बिनधास्त गाठ
त्यासाठी बांध मनाशी खूणगाठ...
तुच आहेस सबला...
तूच आहेस शक्ती, भक्ती
तूच आहेस तुझी स्त्री मुक्ती....
कवेत घे आकाश
तूच आहेस गं नारी
उद्याचा धगधगता प्रकाश....!
तूच आहेस जाज्वल्य इतिहास
तूच आहेस देशाचा मान
घराचा अभिमान...
देशाची शान....
नारी तुझा सम्मान....!!


कवयित्री
 मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...