साहित्य सेवा प्रकाशन आयोजित काव्य स्पर्धा
दिनांक -२७/२/२०२६
विषय - मराठी भाषा गौरव दिन
शीर्षक - माझ्या मराठीची शान
माझ्या मराठीची शान ,दऱ्याखोऱ्यात नांदते
बोल मराठीचे श्लोक, तुका, ज्ञानोबा बोलते ...||
माझ्या कवितेला साज, शब्द मराठी लावते
बोल मराठीचे थेट, काळजाला हो भिडते....||
माझी बहीणाई, जनी, ओवी जात्यावर गाते
धमन्याधमन्यातही, माय मराठी वाहते....||
ओवी,भारुड, पोवाडा, साज शृंगारही घेते
बोल बोबडेही बाळ, शब्द मराठीत येते...||
बोल कीर्तनाचे रंगी, साज मराठी लावते
बोल मराठीचे मृदू , नित्य मनाला भावते ....||
गीत, गझल सुंदर, शब्द झंकार मांडते
शिवशंभु संस्कारीत, शब्द मोती हे सांडते ...||
माझ्या मराठीची शान, दाही दिशा नित्य गाजे
माझ्या मराठीचा डंका, साऱ्या जगात हो वाजे....||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
वाशिम
No comments:
Post a Comment