मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 16, 2026

११) पळस (आयुर्वेदिक कविता)

 ११) पळस (आयुर्वेदिक कविता)

पळसाला पाने तीनच 
म्हण जरी आहे खरी 
पण पळसाच्या पाने, फुले, सालीने 
होतात कित्येक रोग बरी ....!!

पळसांच्या बियांच्या वापराने 
मरून जातात पोटातील जंत 
मधुमेहावर नियंत्रण करते अन् 
त्वचारोग बरा करून कमी करी संधिवात...!!

 खरुज, गजकर्ण, खाज 
करी त्वचा विकार दूर 
पचनसंस्था सुधारते अन्
पोटातील जळजळ होते भूर्रर....!!

पळसांच्या पानांच्या लेपाने 
सांधेवात आणि सूज होते कमी 
पळसावरील डिंक सेवनाने 
महिलांना मासिक पाळीची हमी ....!!

कडक उन्हाळ्यात ही बघा 
 डौलाने फुलतो पळस 
नैसर्गिक रंग बनते फुलापासून 
फक्त बनवायला नका करू आळस...!!

ओसाड माळरानी पळस फुलतो
भुरळ घालतो मानवी मनाला
धैर्याने सामोरे जावे माणसाने 
जणू ओरडून सांगतो जनाला....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
जांभरून नावजी, वाशिम 

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...