बहुगुणी बेलपत्र
आयुर्वेदामध्ये महत्त्व फार
बेलाचे पानांच्या खाण्याने
बरेच कमी होतात विकार....!!
पचनसंस्था सुधारते
कमी होतो अतिसार
बद्धकोष्ठता दूर करी
कमी होईल मधुमेहाचे आजार ....!!
मधुमेहावरचा रामबाण उपाय
वाढते रोगप्रतिकारक शक्ती
बेलपत्राच्या पूजनाने मग
वाढेल महादेवाची भक्ती ......!!
शिवाला अत्यंत प्रिय असे
धार्मिक पूजेमध्येही तितकेच महत्त्व
बेलपत्रामुळे शरीराला ऊर्जा मिळे
कफ, वात दूर करे बेलाचे सत्व....!!
तीन पानांचे बेल हे
औषधी गुणांची खाण
उन्हाळ्यात तहान शमवी
महादेवाच्या पूजेला सर्वात आधी मान...!!
बेलपत्राच्या सरबताने बघा
उन्हाळ्यात पोटास मिळे थंडावा
मुळव्याधीमध्ये आराम मिळतो
असे गुणकारी बेलाचे झाड लावा....!!
कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा
No comments:
Post a Comment