मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Wednesday, April 1, 2026

चिमणी दिनानिमित्त कविता (२२ मार्च २०२६)

 चिमणी दिनानिमित्त कविता ( २२ मार्च २०२६)

येता चिवचिव करी
डोळे इवले इवले 
देह सानुला सानुला 
चिमुकली ती पाऊले....

लुकलुक मान हले 
चिमणी दारात येते
टिपुणीया सारे दाणे 
उडूनिया मग जाते.....

इवलासा जीव तिचा
होई कासावीस सदा
पाहुणी जणू तीच
तीची वेगळी ती अदा....

ठेवा येळणीत पाणी 
बांधा झाडाला येळण 
थंडगार सावलीत 
दाणे टिपत खेळणं....!!

इवलाश्या गे चोचीत 
घेई इवलासा घास 
टकमक पहातसे 
कुणी आहे आसपास?

दाणे टिपाया येईल 
आला कडक उन्हाळा
तिचा व्याकुळला जीव
कधी येई पावसाळा....

खरकटे नाही दारी
घेती बंगल्याने जागा
चिमणी दिनानिमित्त 
जबाबदारीने वागा......

चिमणी दिनानिमित्त 
सा-यांना शुभेच्छा 
इवलासा जिवाची रे 
पूर्व कर सा-या इच्छा

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे मॅडम वाशिम

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...