मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Wednesday, April 1, 2026

१३) केल रशियन भाजी (आयुर्वेदिक कविता)

 १३) केल रशियन भाजी(आयुर्वेदिक कविता)

ही एक रशियन भाजी 
केल तिचे नाव आहे 
त्यात कोणकोणते पौष्टिक घटक 
मिनू त्याचा संदर्भ पाहे....!!

विटामिन ए विटामिन सी 
 विटामिन के व कॅल्शियम असे भरपूर 
पोटॅशियम व मॅग्नेशियम 
 आणि काय ब्रोहाइड्रेट्सचे प्रमाण पुरेपूर ...!!

हृदयासाठी खूप फायदेशीर 
भरपूर असतो फायबर 
कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि 
आटोक्यात ठेवतो ब्लडप्रेशर ....!!

अँटिऑक्सिडेंट्स मुळे 
फॅट होते कमीत कमी 
जुने आजार पळून जातील 
मिळेल  निरोगी शरीराची हमी....!!

 भरपूर कॅल्शियममुळे 
हाडे होतात खूप मजबूत 
कॅन्सर पासून बचाव होतो 
केल जणू आरोग्याचा दूत....!!

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते 
विटामिन ए मुळे सुधारते डोळ्यांची दृष्टी 
आयुर्वेदाचा खजिना अमाप आणि 
औषधी गुणांनी युक्त भरली सृष्टी.....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक 
शाळा जांभरून नावजी

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...