मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, April 5, 2022

सयाजी शिंदे- देवराईचा वटवृक्ष

*स्पर्धेसाठी*

विषय: सयाजी शिंदे:देवराईचा वटवृक्ष

अभिनेता सयाजी शिंदे
देवराईचा वटवृक्ष
निसर्गाचा खरा मित्र
वृक्ष लावण्या असे दक्ष....!!

नानाविध भाषा बोलतो
गाजविले मराठी व कॉलीवूड
अभिनयाने छाप उमटवितो
गाजवले बॉलिवूड, कॉलीवूड...!!

पावणे दोन लाख वृक्ष
माळरानी देवराईला लावले
झाडे लावा झाडे जगवा
स्व कृतीतून जगास दावले....!!

सच्चा दिलाचा राजा माणसाने
ऑक्सिजन झोन तयार केला
झाडे किती महत्त्वाचे असतात
कृतीतून आपुल्या दावून गेला....!!

अभिनेता,नट ते उत्तम कलाकार
त्यांनी ओसाड माळरान फुलविले
वृक्षसंवर्धन गरज काळाची आहे
पावणेदोन लाख वृक्ष लाविले....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...