मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, May 3, 2022

डोकं शांत ठेवायला शिका (मुक्तछंद काव्यप्रकार)

 *डोकं शांत ठेवायला शिका*(मुक्तछंद काव्यप्रकार)


कुणी कितीही भडकावलीत डोकी

भरलं कितीही डोक्यात खूळ

तरीही डोकं शांत ठेवायला शिका

उकरित बसू नका जातियतेचं मूळ...

अल्ला आणि ईश्र्वर फक्त नावंच वेगळी

स्वर्ग आणि जन्नत शेवटी एकच

मग कशाला करताय वाद

भोंग्यावरून विनाकारणच...

संविधानाने दिला आहे अधिकार

प्रत्येकाला आपापले

सण उत्सव साजरे करण्याचा

विणाकारण आजच

त्रास व्हायला लागला का इथे भोंग्याचा....

छत्रपती शिवाजी महाराजांनी

गडावरच बांधल्या मशिदी

आदर केला प्रत्येक जातीधर्माचा...

त्यांना नाही झाला त्रास कधी भोंग्याचा...

नका पेटवू डोकी तरूणांची?

नका भेदभाव करू हिंदू मुस्लिमांची

मान्य आहे आवाज कमी ठेवावा भोंग्याचा...

पण भोंगाच काढून टाका

असला अट्टाहास काय कामाचा....

शांत,संयमी रहावं जनतेनी

धर्माच्या नावाखाली माणसांचीच

डोकी कशाला भडकावायची....

ठेवा सर्वधर्मसमभाव 

जाणिव ठेवा एकतेची....

हिंदू मुस्लिम शिख ईसाई

सब है भाई भाई

प्रेम पाश में बंधे रहे तो

होगी नही लढाई....

कसं विसरून चालतील या ओळी

कळत नाही इथं कुणी

कुणाच्या तव्यावर कोण भाजतय पोळी?

नका भडकावू लोकांचा माथा

जागृत सुज्ञ नागरिकांनो

डोकं शांत ठेवायला शिका...

डोकं शांत ठेवायला शिका....



*कवयित्री*

*मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...