झाले कैक आज सभ्यतेचे चोर
जगा दाखविती आम्ही किती थोर...?
जिकडे पाहावे तिकडे चोरांचा बाजार
जडला आहे का? कसला तो आजार?
वाढले आज पावलागणिक चोरांचे प्रकार
नानाविध घोटाळे करून कसले ते लाचार?
कुणी असती चिंगीचोर,कुणी असे सभ्य चोर
कुणी करती लुटमार,कुणी असती दरोडेखोर...
कुणी असती पाकीटमार,कुणी असती शिरजोर
कुणी असती बायकाचोर,कुणी असती हेकेखोर...
कुणी असती कमजोर,कुणी असती धान्यचोर
कुणी असती नोटाचोर,कुणी असती सभ्यचोर...
किती लागते हो जीवन जगाया पार
छोट्या ठेवा अपेक्षा,मोहमायेचा बाजार...
एकदा तरी तुम्ही वाचा आयुष्यात गीतासार
जीवन नाही होणार कधी कुणाला रे भार...
जैसे कर्म करशील तैसे फळ देतो भगवान
देर है मगर अॅंधेर नही उस भगवान के द्वार...
नाही सांगता येतं कधी तुटेल श्वासाची दोर
नको समजू गड्या स्वतःस लय हुशार....
मिनू म्हणे आता खोलीन तुझे सारे पोल
किंमतीवान जीवन नको करूस मातीमोल....
नको करूस मातीमोल....
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.
No comments:
Post a Comment