मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, January 13, 2026

कवी काय असतो?

 कवी काय असतो?


कवी असतो मुक्त मनाचा
कवी असतो धनी शब्दांचा 
कवी असतो निरंतर लिहीणारा 
कवी असतो मनातला बोलणारा....

कवी असतो वाचा फोडणारा
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो नियमात वागणारा 
कवी असतो कवितेला जागणारा....

कवी असतो मुक्त शब्दांना गुंफणारा 
कवी असतो आशेत जगणारा 
कवी असतो जागवणारा 
कवी नसतो कधीच रागावणारा.....

कवी असतो निरंतर प्रवाह 
कवी असतो स्वच्छंद 
कवी असतो शब्दांवर प्रेम करणारा 
कवी असतो शब्दांच्या प्रेमात पडणारा...

कवी नसतो कधीच रडणारा 
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो सदा आशावादी 
कवींच्या कुणी नाही लागू नादी......!!

कवीत असतो आगळावेगळा भाव 
मुक्तछंद सदाही त्यांचे कवी ऐसे नांव 
कवितेच्या प्रेमात पडणे एवढेच त्याला ठावं 
कवी काय असतो....? एका कवीलाच ठावं...

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम
*महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...