मिनू
Friday, January 23, 2026
सोड सोड हेवेदावे (अष्टाक्षरी काव्य)
सोड हेवेदावे (अष्टाक्षरी)
सोड सोड हेवेदावे
सारे जगतासी ठावे
नको काढू उणेदुणे
सदा आनंदी रहावे....!!
काय आपण करावे
आपुल्या मना पुसावे
सत्याच्या शोधात सखे
सदा आनंदी असावे....!!
ज्याचे त्याचे असे माप
आपण का ते तोलावे
कुणा दुखवेल असे
नाही शब्द ते बोलावे....!!
सोड सोड हेवेदावे
जे जे आपणासी ठावे
ते इतरांसी सांगावे
सदा खरे ते बोलावे....!!
सोड सोड हेवेदावे
आपुले कर्म ते करावे
ज्याचे त्याचे तैसे कर्म
ज्याचे त्यानेच भरावे.....!!
आकाशाला गवसणी
भाग्य थोर तुझे ठरावे
सदा सा-यांचे बनून
सुख जीवनी पुरावे....!!
एकमेकांच्या आयुष्यात
सुगंधीरूपी फुलावे
प्रेमसागरात डुबू निया
हळुवार तू डुलावे.....!!
कार्याची ती गोड थाप
कधी नाही विसरावे
मरावे परी सखये
किर्तीरूपी तू उरावे....!!
किर्तीरूपी तू उरावे.....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम
Subscribe to:
Post Comments (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...
No comments:
Post a Comment