मिनू
Tuesday, August 16, 2022
Tuesday, August 2, 2022
मानवी मनाला कवितेची पालवी फुटणारा काव्यसंग्रह म्हणजे - बहर
*मानवी मनाला कवितेची पालवी फुटणारा काव्यसंग्रह म्हणजे -बहर*
धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री माझी मैत्रीण सौ अनुराधा रत्नाकर उपासे तालुका तुळजापूर मु.पो.मंगरूळ यांचा बहर नावाचा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला आणि वाचताना कांही क्षणासाठी स्वतःला विसरून गेले कवयित्री सायन्स ची विद्यार्थिनी असूनही मराठी भाषेची गोडी अवीट आहे. मातृभाषेचा गोडवा मराठीची, माया अपार दिसून येते भाषेतील माधुरी शब्दसौंदर्याने खचाखच भरलेला काव्यसंग्रह म्हणजे बहर.
बहर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर येथील प्रकाशक श्री प्रवीण भाकरे यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती २३ एप्रिल 2022 (95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर, लातूर )येथे प्रकाशित केले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये असले तरी आपल्या सर्वच कविता मानवी मनाला स्पर्श करून जाणा- आहेत. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ सुदर्शन बारा पात्रे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेशी असे रेखाटले आहे मुखपृष्ठावर गुलाबी रंगाच्या फुलांचा भर असलेले मुखपृष्ठ वाचकांच्या मनाला पालवी फोडणारे आहे.
माझं भाग्यच सासर
सासू आहे जशी माय
सुख देणारा गं धनी
आणि हवे तरी काय...
वाडा जरी जुना तरी
वृक्षवेली भरपूर
मिळेल शुद्ध हवा अशी
प्राणवायू पुरेपूर....
कवयित्री अनुराधा उपासे यांनी वरील ओळीमध्ये सुंदर अष्टाक्षरीमध्ये सासरचे गोड कौतुक केलेले आहे. सासर हेच माझं भाग्य. सासू म्हणजे दुसरी आईच असते. आजकाल सासू-सासर्यांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या बायकांच्या थोबाडावर जबरदस्त चपराक बसावी असे अंतर्मनाला भिडणारे शब्द आजच्या काळातील कवयित्री अनुराधा उपासे यांनी आपल्या कवितेतून मांडले आहे. आणखीन मला काही नको या शब्दांमधून कवयित्रीच्या मनाचा उदारपणा या ठिकाणी दिसून येतो आजकालच्या काळातील बहुतांश सुना मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली की शहराच्या ठिकाणी जाऊन आलिशान बंगले बांधून आई-वडिलांपासून कोसो दूर जाऊन राहतात. त्यांना माहिती असतं की आई-वडीलच काय त्यांचं गाव सोडून शहरात राहायला येत नाहीत. आई-वडिलांना सांभाळायचं काय हवं नको? ते पाहायचं कामच नाही पण याचं काळातील कवयित्री अनुराधा उपासने या शिक्षिका असूनही आपल्या गावाकडील मातीशी घट्ट नाळ जोडून, सासू-सासर्यांची सेवा करतात आणि जुन्यात वाड्यात राहतात. उलट त्या म्हणतात वाडा जरी जुना तरी वृक्षवेली भरपूर मिळेल शुद्ध हवा अशी प्राणवायू पुरेपूर गावी भरपूर प्रमाणात वृक्ष असतात त्यामुळे शुद्ध हवा ग्रामीण भागात पुरेपूर मिळते त्यावरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची जाण असल्याचे व वृक्षवेलीवरचे प्रेम दिसून येते
वेळप्रसंगी बन भाऊराया
माझा तू पाठीराखा
जसा तारण्यास द्रोपतीला
धावला श्रीकृष्ण सखा...!!
महाभारतामध्ये द्रोपतीचे वस्त्रहरण झाले होते तेंव्हा द्रोपतीची अब्रू राखण्यासाठी श्रीकृष्ण धावून गेले आणि द्रोपतीची अब्रू वाचवली. अगदी त्याचप्रमाणे माझ्या बंधुराया तू सुद्धा माझ्या वेळ प्रसंगी धावून ये.माझा पाठीराखा हो. असे संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ.कवयित्री अनुराधा उपासे आहे वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात आजच्या काळात कोण कोणाचा भाऊ राहिला नाही. ना बहिणीचे तसे प्रेम राहिले नाही. वहिनी सुद्धा माहेरी हिस्सा टाकताना दिसतात आणि भाऊ सुद्धा बहिणीला साडीचोळी बांगड्या सण, उत्सवाला बहिणीला साडीचोळी करताना दिसत नाहीत.कशीतच असतीलही पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.भावा-बहिणींच्या नात्यांमध्ये स्वार्थ भरलेला दिसत आहे. भाऊ रक्षाबंधनाला बहिणीकडे जात नाही. बिचारी बहीण वाट बघत बसते.तिचे डोळे वाटेकडेच लागलेले असतात. पूर्वीच्या काळी माहेरवासीनी माहेरी पंचमीच्या सणाला बोलावून आणायचे ते रक्षाबंधन झाल्यावरच बहीण सासरी जायची. ती माया ती ओढ ,ते प्रेम आजच्या काळात राहिलेले नाही हे वास्तव आहे संवेदनशील मनाच्या कवयित्री इथे भाऊ होताना दिसतात व भावासाठी जगातील सर्व सुखदेवाकडे मागतात इतकेच नाही तर माझ्या आई-बाबांना जप म्हणून काव्यातून सांगतात
कळी पाहता झाडावरची
मनात अनेक शंका येतात
काय माहीत कुणास ठाऊक
कळीची फुले कसे होतात?
सुगंध सुरेख मिळताच
दरवळ साऱ्या आसमंती
रहस्य फुलांच्या सुगंधाचे
जाणण्या झाली सुन्न मती...
निसर्गाचे अद्भुत चक्र माणसाला आजपर्यंत कळले नाही. जसा रात्री नंतर दिवस येतो.दिवसा मागून रात्र. जसे ऋतुचक्र बदलत राहते. पावसाळ्यानंतर हिवाळा. हिवाळ्यानंतर उन्हाळा असे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येतात. वेगवेगळी फुले येतात. वेगवेगळ्या रानभाज्या येतात. तसेच झाडावरच्या कळीला पाहिल्यावर कवित्रीच्या मनामध्ये कुतुहल निर्माण होते. कळीचे फुल कसे होते? बियांचे कोंब कसे येतात ? त्यानंतर हिरवीगार कळी डोलते खरंच त्यात रंग कोण भरते? सुगंध कोण भरतो ? फुलांच्या सुगंधाच्या रहस्याने कवयित्रीची मती सुन्न झाली. आणि खरंच अख्या जगाला नवल वाटावं. कोड पडावं अशी निसर्गाची किमया आहे. वरील ओळीवरून कवयित्रीला निसर्गाची आवड व निरीक्षण, निसर्गाबद्दलची गोडी, प्रेम कळून येते.
सुजलाम सुफलाम
देश माझा किती छान
अनेक संत येथे जन्मले
मिळाले संस्कार महान
हा देश शूरवीरांचा
कीर्ती शौर्याची गाथा
जवानांनी अर्पिले प्राण
चरणी त्यांच्या माथा....
भारत देश हा सुजलाम् सुफलाम् आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या देशात अनेक संत जन्मले. अनेक थोर क्रांतीकारक जन्माला आले. आणि संतामुळे या देशाला चांगले संस्कार मिळाले. हा भारत देश शूरवीरांचा आहे. या देशाच्या संरक्षणासाठी किती जवानांनी हसत हसत आपल्या प्राणांचे आहुती दिली आहे. कित्येक जवान सैनिक देशासाठी शहीद झाले आहेत.कवयित्री अनुराधा उपासे या सर्व भारतीयांच्या चरणी नतमस्तक होऊ पाहत आहेत.
ये ग ये ग ननंद बाई
झाली मला बाई घाई
दोघी मिळून जात्यावर
ओवी गात दळण दळून...
हा बहाणा ग दळणाचा
सुख दुःख सांगायचा
वेळ मिळेल बोलायला
ओव्यातून गाण्याचा....
ओवी हा एक गेय प्रकार व आपण लक्ष लयीत जाऊ शकतो पूर्वीच्या काही सुमधुर आवाजात स्त्रिया पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळताना गायीच्या आज जात्यावरची दळण राहिली नाही ना ओव्या राहिल्या आहेत सर्व जागा यंत्रांनी घेतली आणि मानवाचे शारीरिक श्रम कमी झाले. तसे पुर्वीचे लोकं शंभरी गाठायचे पण कमी झाले. लोक अल्पायुषी झाले. ओवी मधून संसाराचे सुखदुःख गायले जायचे. ओळीच्या माध्यमातून बायकांचे मनमोकळे व्हायचे. कवयित्री अनुराधाताईंना आजही ओव्या रचता येतात. वरील ओवी मध्ये कवयित्री आपल्या नंदेला दोघी मिळून जात्यावर ओळी दादासाठी आवाज देतात दळण तर हा बहाना आहे. ओवी गाता गाता सुखदुःख सांगायचं तेवढाच बोलायला वेळ मिळे. ओव्याच्या गाण्यातून अशा अनेक ओव्या मधून घरातील वडीलधारी मंडळीची खुशाली पूर्वीच्या बायका सांगत असत. आजच्या काळात बोलण्याची अनेक साधने निघाली पण संवाद मात्र कमी झाला. सुविधा अनेक निघाल्या पण जिव्हाळा आपुलकी कमी झाली हे आजच्या काळातली भयान्वस्त आहे.
कवयित्री अनुराधा उपासे यांच्या अनेक कविता काळजाला हात घालणा-या आहेत. त्यांच्या बहर या काव्यसंग्रहात अनेक सुंदर सुंदर कवितांचा बहर आला आहे. हे काव्यसंग्रह वाचताना जाणवते. शेतकऱ्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, नात्यांचा गोतावळा,देशप्रेम, बंधुता बेरोजगारीचे जीवन, निसर्ग, जिजाऊ माँसाहेब , अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले,अनाथांची माय- सिंधुताई अशा सर्व गुणसंपन्न नारीचा गुणगान गाणाऱ्या कविता वाचकाला चौफेर एखाद्या बगीचा मध्ये फिरवून आणल्यासारखे वाटतात. बहर हा काव्यसंग्रह मनाणाला उभारी तर देणारा आहेस पण बलिदानासारख्या कवितेतून आत्मचिंतन करायला लावणार आहे.प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बहर.... कवयित्री सो अनुराधा उपासना यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम
पीन - 444505
Monday, July 11, 2022
विठ्ठल विठ्ठल...(अभंग रचना)
*विठ्ठल विठ्ठल*
हरपले भान | तुझ्या भजनात |
विठ्ठल मनात | जनाचिया ||
चंद्रभागे तिरी | उभा विटेवरी |
लाखो वारकरी | पंढरीत ||
ओढ दर्शनाची | चाले वारकरी |
धन्य ती पंढरी | आज झाली ||
टाळ,विणा हाती | वाजतो मृदंग |
भजनात दंग | वारकरी ||
रूप पहाताच | धन्य झाले जन |
हरपले मन | विठुराया ||
गोड रूप तुझे | मनीठायी वसे |
स्वप्नातच दिसे | पांडुरंग ||
विठ्ठल विठ्ठल | मन मंदिरात |
तुझ्या रे नामात | रंगले मी ||
विठ्ठल आशिष | ठेव सदा डोई |
धन्य धन्य होई | जीवनात ||
तूच पाठीराखा | बा विठ्ठला माझा |
विसर न तुझा | व्हावा कधी ||
मिनू म्हणे आता | मनातील इच्छा
सर्वांना शुभेच्छा | एकादशी ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
Thursday, June 30, 2022
शैक्षणिक गीत-ये गं पारू
शैक्षणिक गीत
ये गं पारू
ये गं पारू, उड्या नको मारू
चल गिरवूया अक्षर...
चल गिरवूया अक्षर अन्
होवूया सारे साक्षर.....
ये गं रमा, ये गं उमा
चल मोजून उड्या मारूया...
चल मोजून उड्या मारूया अन्
संख्याच्या गावाला जाऊया...
ये रे रवी,पाहू दे वही
चल एबीसिडी काढूया
चल एबीसिडी काढूया अन्
इंग्रजी अक्षरे वाचूया...
ये गं पारू,ये गं सरू
चल जरा खेळ खेळूया
चल जरा खेळ खेळूया अन्
एकमेकामागे पळूया....
ये गं सई ये गं माई
चल वारांचे गाणे गाऊया...
वारांचे गाणे गाऊया अन्
मामाच्या गावाला जाऊया...
ये रे गणू,ये गं अणू
चल शब्दांच्या भेंड्या खेळूया
शब्द भेंड्या खेळूया अन्
धावण्यासाठी पळूया....
ये गं राणी,ये गं शहाणी
चल एकच ध्यास धरूया...
चल एकच ध्यास धरूया अन्
खूप खूप अभ्यास करूया...
*कवयित्री/लेखिका/शिक्षिका/समिक्षिका*
*मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*
*ता.जि.वाशिम*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Tuesday, May 24, 2022
मनाचा खुजेपणा...!!
*मनाचा खुजेपणा*
दिवसेंदिवस वाढत चालला इथे
माणसाच्या मनाचा खुजेपणा
माझ्यासारखे कुणीच नाही म्हणत
वाढत चालला स्वत:चा मीपणा...!!
आपल्याच दुनियेत गुंग सारे
दुनियादारीचे काही घेणे नाही
स्वार्थ, अहंभाव वाढत चालला
कधी कुणाला काही देणे नाही....!!
माणुसकी शब्द आता सांगण्यापुरता
माणुसकी फक्त शब्दातच न्हाली
विभक्त कुटुंबपद्धती जशी आली
तसतशी मग मने संकुचित झाली....!!
गोरगरीबांचे काही कुणा वाटत नाही
स्वत:पुरता परमार्थ दाखवत राही
इतरास हिनवण्यातच जन्म जाई
पाहणारा सर्व वरतून पाही....!!
नात्यागोत्यातही आजकाल तसेच आहे
वाढत चालला रोज मनाचा खुजेपणा
संपत्तीच्या मोहापायी नाही राहीला
सख्ख्या भावाबहिणीत माझेपणा....!!
गाडी,बंगला,पैसाअडका सर्व क्षणभंगूर
असू दे जिव्हाळा आणि मायेची ओल
काहीच सोबत येत नाही रे वेड्या
एकदिवस तुलाच व्हावं लागेल मातीमोल...!!
म्हणून म्हणते अजून वेळ गेली नाही
ठेवू नकोस तुझ्या मनाचा खुजेपणा
दुसऱ्याचा कधी होऊन तर बघ ना
आपोआप वाढेल तुझ्या मनाचा मोठेपणा...!!
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७
Wednesday, May 11, 2022
जिल्हा परिषद शाळा- शफी बोल्डेकर,
जिल्हा परिषद शाळा
आवडते मज जिल्हा परिषद शाळा
वाघीणीचं दूध मिळे शिक्षण घे बाळा ।। धृ।।
गुरू शिष्याचे नाते हीच खरी संपत्ती
अभ्यासाची दिशा ही विद्यार्थाची प्रगती
सृजन प्रतिभेचा फुले संस्कार मळा ।। १ ।।
रोज गुरुजींना जे भेटतील पालक
शिक्षणाचा हक्क कळे तो खरा मालक
परिवर्तन करा जीवनाचा सोहळा ।। २ ।।
राष्ट्रीय सणाला सांस्कृतिक कार्यक्रम
बोलके विद्यार्थी झाले शिक्षकाचे श्रम
भविष्याच्या चिंतनाचा मिळे इथे डोळा ।।३ ।।
विकासाचा आराखडा समाजाचा साथी
नांदू एकीने विसरू धर्मभेद जाती
भारत देशा नेऊ उंच उंच आभाळा ।। ४ ।।
- शफी बोल्डेकर ,
कळमनुरी.
मो. ७७९८९६७७९३
Monday, May 9, 2022
*दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे-काईमेरा*
*दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे -काईमेरा कादंबरी*
विदर्भाच्या मातीत जन्मलेले प्रसिद्ध लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा नुकतीच वाचनात आली. २०२०-२१ साली अख्ख्या जगावर कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते. लाखो जीवांचे खूप हाल झाले.लाखो जीव व्हेंटिलेटरवर न ठेवल्याने मरण पावले. स्मशानापर्यंत जायला ही जागा मिळत नव्हती. असा भयानक काळ सर्वांनी अनुभवलाय.काईमेरा म्हणजे एका महाभयंकर विषाणू ची जन्म . कथा एका महाभयंकर विषाणूच्या जन्माचे रहस्य उलगडून दाखवणारे विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा
काईमेरा या कादंबरीचे लेखक संजय महल्ले अमरावती यांनी खूप अभ्यास पूर्वक इतिहास व चीनच्या चीनच्या मानवी महत्त्वकांक्षीची , युद्धखोर नीतीची आणि मगर राष्ट्रवादाची मराठी साहित्याला ओळख करून देणारे विदर्भाच्या मातीतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा रूप आणि आशयाच्या विविध संकेत आसन उगवलेली काईमेरा ही पहिलीच कादंबरी असावी. या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिशिंग हाऊस , अमरावती असून लेखकांचे स्वतःचे प्रकाशन आहे.याची प्रथम आवृत्ती २६ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली. या कादंबरीचे मूल्य केवळ १५० रुपये असून याचे मुखपृष्ठ कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीचे दृश्य दाखवणारे,मास्क घातलेल्या व्यक्तीचे आहे. या कादंबरीची मांडणी अत्यंत उत्कृष्ट असून प्रस्तावना प्राध्यापक राजेंद्र राऊत यांची लाभली आहे. पाठराखण डॉ. संजय लोहकरे यांची लाभली आहे. ही कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच असून ती ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
covid-19 च्या रूपाने अत्यंत गंभीर परिणाम सर्वच देश भोगत असताना काईमेरा ही कादंबरी समस्त वैज्ञानिक जगताला डोळेसता प्रदान करते. सामरिक स्पर्धेत चीन अमेरिकेपुढे हतबल होत असतानाच शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रो.यांग महाभयंकर विषाणूचा प्रयोग करू इच्छितात. ते अमेरिकेतील प्रख्यात व विषाणूतज्ञ डॉ. डेव्हिड यांना बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनचे प्रख्यात जैवविषाणूतज्ञ डॉ.डेव्हिड यांना चीनला बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनची प्रख्यात व्हॉयरॉलॉजिस्ट डॉ.फेन देतात. पुढे कथानक जसे जसे वळण घेत जाते तसतशी वाचकाची उत्सुकता वाढत जाते.
जगावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या चीनचा जगाला कसा धोका होऊ शकतो? मानवी जीवन न युद्ध करता कसे संपवता येईल? जैविकाचे शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल? याची संपूर्ण तयारी चीन देश करीत होता. याचे सखोल चित्रण या कादंबरीत आले आहे. यांत्रिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या चीन या देशाचे सुरक्षा सल्लागार प्रो.यांग यांनी कोलंबिया विद्यापीठात ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लिट करीत असताना त्यांचे अमेरिकेचे मित्र डॉ. डेव्हीड यांना चीनमध्ये संशोधन करण्यासाठी बोलावतात. डेव्हिड यांनी बरीच वर्ष त्यांचा आग्रह टाळला होता.कालांतराने डेव्हिड यांच्या यांच्या एका अतिशय संशोधनाबद्दलची चर्चा प्रो.यांग यांच्या कानावर आली.काही जातीच्या वटवाघुळामुळे जिवंत मानवी शरीराला कुजवू शकतील असे महाभयंकर घातक विषाणू असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्याचा संसर्ग झाल्यास अतिशय वेगाने पसरू शकणाऱ्या या महामारीने संपूर्ण मानवी जीवन संकटात येईल. असा इशाराही त्यांनी दिला होता. या संशोधनासाठी डॉ.डेव्हिड यांनी अमेरिकाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगले ही पालथी घातल्याचे प्रो.यांग यांना समजले होते.
प्रो.यांग यांनी तायवानवर हल्ला करून तो ताब्यात घेण्यासाठी 'ऑपरेशन १००' ही गुप्त मोहीम काढली होती. या मोहिमेत जैविक शस्त्रांचा वापर गुप्तपणे करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी प्रो.यांग यांनी डॉ.डेव्हीड यांची निवड केली होती. डॉ. डेव्हिड वर अतिविश्वास असलेल्या प्रो.यांगने जैविक युद्धाची तयारी दर्शवली होती. शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन पुरोहित यांनी एक प्लॅनिंग संरक्षण मंत्र्यांना दिलं. डॉ. डेव्हिड यांनी हॉर्स शूली दोन वेगवेगळे कोरोना विषाणू संक्रमित केले. एकाच वेळी एकत्रितपणे दिले त्यामुळे दोन विषाणूच्या युतीतून जन्माला येईल तिसरा महाभयंकर स्ट्रॉंग विषाणू काईमेरा. निसर्गात कुठेही आढळून येणार नाही असा घातक विषाणू म्हणजे काईमेरा होय.
डॉक्टर डेव्हिड यांनी महाभयंकर विषाणूची निर्मिती केली खरी पण तो महाभयंकर न ठेवता फक्त श्वसनाचा जास्त त्रास होणाऱा विषाणू तयार केला. मला फसवलं ही बातमी जेव्हा मेजर प्रो.यांग यांना सांगितलं. तेव्हा कोणाचाच विश्वास बसेना असा झाला चिनी लष्कराने तायवान विरुद्ध ऑपरेशन 100 ही गुप्त मोहीम उघडण्याची व त्यात जैविक शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी घातक विषाणूचा शोध सुरू केल्याची कुणकुण अमेरिकेला लागली होती. त्यामुळे ते ऑपरेशन फेल करण्याची जबाबदारी गुप्तहेर डॉ.डेव्हिड यांच्यावर सोपविण्यात आली. यांनी त्यांच्या स्वभाव बद्दल माहिती होते मानवी शरीर कुजणाऱ्या विषाणूची खोटी बातमी ॉक्टर डेव्हिड यांनी पसरली आणि ऑपरेशन 100 ठेवले त्याची सर्व माहिती अमेरिकेला पुरवली. एक दिवस डॉक्टर वटवाघुळ और प्रयोग करून फरार झाले जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्वास बसेना त्याची मती गुंग झाली.
दोन देशाचा महासंग्रामात एका महाभयंकर विषाणूचा जन्म होतो.तो म्हणजे काईमेरा. संजय महल्ले यांनी तिसऱ्या महायुद्धाची जैविक आणि जैविक युद्ध करू पाहणाऱ्या चीनची पोल-खोल अतिशय सविस्तरपणे, तपशिलासह, विनोदी प्रसंग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घातकी दुरुपयोग या कादंबरीच्या रुपाने प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन काईमेरा ही विज्ञान कादंबरी साहित्य क्षेत्रातील पहिलीच कादंबरी असावी....
प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच विज्ञानाधारित कादंबरी म्हणजे काईमेरा
लेखक संजय महाले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समीक्षिका /शिक्षिका/ लेखिका/ कवियित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव
ता. जि.वाशिम
मोबाईल -9767663257
Subscribe to:
Posts (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...



















