मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

कर्तव्य (अभंग प्रकार)

 *कर्तव्य(अभंग प्रकार)*


कर्तव्य आपुले | पुर्ण करावेत |

सदा जाणिवेत | असू द्यावे ||१||


मनी देशसेवा | सदा बाळगावी |

मूल्ये ही जपावी | माणसाने ||२||


कष्टाचीच खावी | आपुली भाकरी |

कशाला रे चोरी | करतोया ||३||


कर्तव्याचे माप | मातापिता थोर |

सेवा तू ही कर | मनोभावे ||४||


भुकेला तान्हेला | कधी ओळखावा |

देव ही  जाणावा | माणसात ||५||


गरीबां मदत | सढळ हाताने |

मोकळ्या मनाने | करावेत ||६||


शुद्ध आचरण | ठेव तू माणसा |

खोटा तो जलसा | कशापायी ||७||


कर्तव्याची दोर | ठेव मजबूत |

दान करावेत | कधीमधी ||८||


मानलाचा जन्म | एकदाच मिळे |

ज्याला खरे कळे | पुण्यवान ||९||


मिनू म्हणे आता | कर्तव्य चांगले |

होईल रे भले | जीवनाचे ||१०||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम







2 comments:

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...