मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

माझा बाळीराजा (अभंग क्र.४)

 माझा बळीराजा (अभंग क्र.४)


राबराब राबी | माझा बळीराजा ||

कोणती ही सजा | उपभोगी || १||


 हवालदिल रे | जगाचा पोशिंदा ||

नाही भाव कांदा | चिंतातूर || २||


शेतकरी राजा | पिकेना रे शेती ||

काळी काळी माती | माझी माय ||३||


अवर्षण यंदा | काडीमोल भाव ||

सांगा कुठं जाव | शेतकरी ||४||


महागाई खूप | बियाणे महाग|

कसा काढू राग | सांग गड्या ||५||


यंदा हो लगीन | थोरली ही पोरं |

लागला हो घोर | जिवा माझ्या ||६||


कसं उजवावं | का कर्ज फेडावं ||

कसं रे जगावं | कळेनाच ||७||


शासनाला जाग | कधी रे येईल ||

 निल रे होईल | कर्ज सारं ||८||


ऐक पांडुरंगा | बळीची रे हाक||

संसाराच चाक | फिरव गा ||९||


मिनू म्हणे आता | पिकू दे शिवार ||

उचल हा भार | पांडुरंगा ||१०||


मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...