मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

गानकोकिळा लतादिदी ( अभंग क्र२)

 *गानकोकिळा लतादिदी(अभंग क्र.२)*


तू गानसम्राज्ञी | तू गानकोकिळा |

किती गोड गळा | लतादिदी ||१||


भारताची शान | तुझा अभिमान |

देशभक्ती गान | गायिले तू ||२||


नैसर्गिक दान | सुंदर ती भेट |

भारतास थेट | मिळाली तू ||३||


सर्वोत्कृष्ट दीदी | तूच गे गायिका |

सुरांची नायिका | लतादिदी ||४||


सुगम संगीत | खेळे पदरात |

कंठ संगितात | येत असे ||५||


पाचही भावंडे | गायनाचा छंद |

संगीतात धुंद | रात्रंदिन ||६||


दिनानाथ गुरु | वडील गायक |

संगिताचा नायक | ख्याती असे ||७||


भारतरत्न तू | संगिताचे राग |

आयुष्याचा त्याग | लतादिदी ||८||


नियतीचा डाव | हरपली मुर्ती ||

जगात गे किर्ती | पसरली ||९||


मिनु म्हणे आज |अर्पू श्रद्धांजली |

ही सुमनांजली | लतादिदी ||१०||


*मिनाक्षी पांडुरंग नागराळे*

*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*

*ता.जि.वाशिम.*

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...