मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

सोडू नये धीर

 *सोडू नये धीर(अभंग प्रकार)* १


सोडू नये धीर | कशाला फिकीर |

हिंमतीने कर | कामधंदा || १||


उगीचच चिंता | द्यावी हो सोडून ||

कंबर कसून | रहावे तू ||२||


जीवनात सदा | संकटे येतात |

निघून जातात | आले तसे ||३||


होवू नये कधी | हतबल, दुःखी |

वेळ ही सारखी | नसते रे || ४||


मेहनत खूप | करावी कसून |

जिद्द मनातून | असू द्यावी || ५||


चिकाटीने काम | सदा करायचे |

नाही हरायचे | जीवनात || ६||


अपेक्षांचे ओझे | कमी ठेवायचे |

सुखी रहायचे | जीवनात || ७ ||


संकटसमयी | सोडू नये धीर |

कशास अधीर | व्हायचे हो || ८||


सत्वपरिक्षा हो | असते जीवनी |

अश्रु का नयनी | येवू द्यावे || ९||


मिनू म्हणे सदा | सोडू नको धीर |

मन तू खंबीर | ठेव सदा || १०||


कवयित्री:- मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...