सोड कुविचार (अभंग क्र.२०)
सोड कुविचार | चांगले वर्तन |
हे परिवर्तन | आण आता ||
जशी दृष्टी तशी | सृष्टी रे भासेल |
जग ही दिसेल | तैसे तैसे ||
कुप्रथांची होळी | जाळून तू टाक |
संसाराचे चाक | फिरे बघ ||
राग,द्वेष, आणि | आसूया तू सोड |
कर तडजोड | थोडीतरी ||
प्रेम आपुलकी | जप ना रे थोडी |
जीवनात गोडी | वाढेल गा ||
अहंकार जाळ | यंदाच्या होळीत |
सुख हो झोळीत | येईल हो ||
सत्कर्म करावे | साधा परमार्थ |
जीवन यथार्थ | होईल रे ||
कष्टाची भाकरी | चाखूनिया खावी |
संस्कृती जपावी | आपुलिया ||
हे सण उत्सव | संस्कृती ही थोर |
पाश्र्चात्यांसमोर | श्रेष्ठ आहे |
मिनू म्हणे आता | सोड कुविचार |
चांगले आचार | ठेव सदा ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
छान आहे कविता
ReplyDelete6व्या कडव्यात येईलच किंवा येईल की जरा जास्त योग्य वाटेल
ReplyDeleteकिंवा सुखच झोळीत येईल हो
या माध्यमातून छान प्रबोधन 👌
ReplyDeleteसर्वांचे मनापासून धन्यवाद..
ReplyDelete