पाणी वाचवा (अभंग क्र.२०)
पाणी हे अमृत | पाणी रे अडवा |
पाणी रे जिरवा | ठेवा ध्यानी ||
जल हे जीवन | जपून वापर |
नको मरमर | पाण्यासाठी ||
पावसाचे पाणी | अडवून ठेवा |
पाणी हो मुरवा | जमिनीत ||
सांडपाण्यावर | लावा हो बगीचा |
हिरवा गालिचा | वाटे जणू ||
कोरडा दुष्काळ | नकोच असेल |
कर रे चांगलं | एक काम ||
अनमोल जल | अपव्यय टाळा |
दुष्काळास आळा | बसेल हो ||
अमृतासमान | पाणी हे जीवन |
होईल पावन | जीवन हे ||
पाण्याची टंचाई | चला संपवूया |
झाडेच लावूया | तयासाठी ||
पाण्याचे महत्त्व | जाण तू माणसा |
नाही भरवसा | पावसाचा ||
मिनू म्हणे आता | पाणी हे जीवन |
नको अवर्षण | ठेव ध्यानी ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

छान प्रबोधन
ReplyDeleteधन्यवाद सर...आपली प्रतिक्रिया नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
Deleteखूप सुंदर रचना
ReplyDelete