आई
अम्मी म्हणू आम्ही
तुम्ही म्हणा आई
शब्दाची कमाई
माय माझी ।। १ ।।
मायेचा वर्षाव
टाळू भर भरू
आई माझी गुरू
बुद्धिवंत ।। २ ।।
दुवा पढू देई
गावभर पाणी
भीतीची गा-हाणी
निरसली ।। ३ ।।
पाटी व लेखणी
दिली माझ्या हाती
फुलवली शेती
जीवनाची ।। ४ ।।
मायेचा सागर
ढग गेले दूर
भरून ये ऊर
आभाळाचा ।। ५ ।।
अम्मीमय झाले
घरातले वारे
खुली झाली दारे
स्वर्गातली ।। ६।।
- शेख शफी बोल्डेकर,
मु. पो. बोल्डागांव ,
ता. कळमनुरी ,
जि. हिंगोली.
मो. ७७९८९६७७९३
आई महिमा अप्रतिम
ReplyDelete