मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, March 26, 2022

कवी शेख शफी बोल्डेकर सर यांचा आई अभंग

 आई


अम्मी म्हणू आम्ही 

तुम्ही म्हणा आई 

शब्दाची कमाई

माय माझी ।। १ ।।


मायेचा वर्षाव

टाळू भर भरू

आई माझी गुरू

 बुद्धिवंत  ।। २  ।।


दुवा पढू देई

गावभर पाणी 

भीतीची गा-हाणी 

 निरसली ।। ३ ।।


पाटी व लेखणी

दिली माझ्या हाती

फुलवली शेती 

जीवनाची  ।। ४ ।।


मायेचा सागर

ढग गेले दूर 

भरून ये ऊर 

 आभाळाचा ।। ५ ।।


अम्मीमय झाले

घरातले वारे

खुली झाली दारे

स्वर्गातली  ।। ६।।


-  शेख शफी बोल्डेकर, 

     मु. पो.  बोल्डागांव ,

     ता. कळमनुरी  ,

     जि.  हिंगोली. 

  मो. ७७९८९६७७९३

1 comment:

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...