मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

शंभू महादेवा (अभंग क्र.१७)

 शंभू महादेवा (अभंग क्र.१७)*


त्रिशूळ डमरू | घेऊनिया हाती |

सोबती पार्वती | महादेवा ||


समुद्र मंथन | विष हो प्राशिले |

हाकेस धावले | देवतांच्या ||


निळकंठ नाम | उदयास आले |

महादेव बोले | पाठीराखा ||


संकटमोचक | शंभू महादेव |

नाही कधी भेव | भक्तालागी ||


ॐ नमः शिवाय | करूयात जप |

आरती व धूप | आवडीचे ||


पांढरा धोतरा | आवडीचे फूल |

अंगीवरी झूल | नंदीच्याही ||


वाघांचे कातडे | देवाचे आसन |

करितो वंदन | महादेवा ||


नंदीवर स्वार | कैलास पर्वत |

पार्वती सोबत | असे सदा ||


भक्ताच्या पाठीशी | राही महादेव |

कशास रे भेव | तुज भक्ता ||


मिनू म्हणे आता | शंभू महादेवा |

धावा तूम्ही घ्यावा | भक्ताचिया ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...