मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

पोटाची खळगी (अभंग क्र.८)

 *पोटाची खळगी(अभंग क्र.८)*


पोटाची खळगी | भरायची चिंता ||

दिस उगवता | गरिबाला || १||


वितभर पोट | आटापिटा करी |

मिळेल भाकरी | खायावया || २ ||


जिवा घालमेल | शोधिसी रे काम

नाहीच आराम | कधी जिवा || ३ ||


सदा मरमर | रोजच मरण ||

असलं जगणं | गरीबांचं ||४||


श्रीमंतांच्या घरी | अन्न वाया जाई |

गरिबांस नाही | घास खाण्या ||५||


कधी मिटे दरी | ही विषमतेची |

व्यथा भाकरीची | कळेल का ||६||


पोटाची खळगी | भरता भरेना |

दिवस जाईना | न खाताना ||७||


वितभर पोट | पण झोप नाही |

पोटाची ही लाही | होत असे ||८||


श्रीमंताला अन्न | जिर्ण रे होईना ||

झोप रे येईना | रात्रंदिन ||९||


गरिबाला चिंता | आजच्या पोटाची ||

चिंता रे रोजची | सतावित ||१०||


अन्न हो वाचवा | गरिबां पाठवा ||

अन्नदान ठेवा | कधी कधी ||११||


मिनु म्हणे आता | करा अन्नदान ||

कार्य हे महान | ठेव ध्यानी ||१२||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...