मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

जातिभेद नको (अभंग क्र.६)

 *जातीभेद नको(अभंग क्र.६)*


जातीभेद नको | रहावे प्रेमाने||

दान ईश्वराने | दिले सर्वा || १||


परमेश्वराची | एकाच लेकरं ||

नाही कुणी थोर | जगाचिया ||२||


नको भेदाभेद | सोडा मोठेपणा |

कशाला मीपणा | अहंभाव ||३||


रित्या हाती येणं | रित्या हाती जाणं||

असलं हे जगणं | माणसाचं ||४||


किर्तीचा सुगंध | पसरो सर्वत्र |

सारे गणगोत्र | ठेवा ध्यानी ||५||


जातीवाद नको | नको तो बढावा |

उगीच दिखावा | शिरजोर ||६||


साधीच राहणी | उच्च ते विचार ||

जीवन साकार | होईल रे ||७||


इतरांच्या काही | पडो तुझा देह ||

नको उहापोह | जीवनात ||८||


जातीवादी कीड | लागली देशाला ||

छळती मनाला | साधुसंता ||९||


मिनु म्हणे आता | सोडा जातीभेद ||

अंती करी खेद | कशापायी ||१०||


कवयित्री/लेखिका/समिक्षिका/शिक्षिका

मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे

जि.प.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम.

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...