मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, May 24, 2022

मनाचा खुजेपणा...!!

*मनाचा खुजेपणा*

दिवसेंदिवस वाढत चालला इथे
माणसाच्या मनाचा खुजेपणा
माझ्यासारखे कुणीच नाही म्हणत
वाढत चालला स्वत:चा मीपणा...!!

आपल्याच दुनियेत गुंग सारे
दुनियादारीचे काही घेणे नाही
स्वार्थ, अहंभाव वाढत चालला
कधी कुणाला काही देणे नाही....!!

माणुसकी शब्द आता सांगण्यापुरता
माणुसकी फक्त शब्दातच न्हाली
विभक्त कुटुंबपद्धती जशी आली
तसतशी मग मने संकुचित झाली....!!

गोरगरीबांचे काही कुणा वाटत नाही
स्वत:पुरता परमार्थ दाखवत राही
इतरास हिनवण्यातच जन्म जाई
पाहणारा सर्व वरतून पाही....!!

नात्यागोत्यातही आजकाल तसेच आहे
वाढत चालला रोज मनाचा खुजेपणा
संपत्तीच्या मोहापायी नाही राहीला
सख्ख्या भावाबहिणीत माझेपणा....!!

गाडी,बंगला,पैसाअडका सर्व क्षणभंगूर
असू दे जिव्हाळा आणि मायेची ओल
काहीच सोबत येत नाही रे वेड्या
एकदिवस तुलाच व्हावं लागेल मातीमोल...!!

म्हणून म्हणते अजून वेळ गेली नाही
ठेवू नकोस तुझ्या मनाचा खुजेपणा
दुसऱ्याचा कधी होऊन तर बघ ना
आपोआप वाढेल तुझ्या मनाचा मोठेपणा...!!

मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७


3 comments:

  1. वर्तमानातील जळजळीत वास्तव अधोरेखित करणारी तथा समाजभान जपण्याचा संदेश देणारी कवीता. पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. खुप छान कविता.मनाचा मोठेपणा प्रत्येकानेच दाखवला तर नात्यात दुरावा कधीच येणार नाही.

    ReplyDelete

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...