९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे ३,४,५ फेब्रुवारी २०२३ चे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून व राज्याच्या बाहेरून देखील कविता मागवल्या होत्या.अडीच हजारांमधून जवळपास पाचशे कवितांची निवड अखिल भारतीय साहित्य संमेलन्यातील कवी कट्ट्यावर झाली होती. त्यात ३ फेब्रुवारी रोजी म्हणजे पहिल्या दिवशी दुपारी तीन ते चार या वेळेत वाशिम जिल्ह्याच्या मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या 'करू अनाथांची सेवा' या अभंगा रचनेचे सादरीकरण झाले. ज्येष्ठ कवी साहित्यिक राजन लाखे व इतर मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी नागराळे यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मिनाक्षी नागराळे यांची यापूर्वी ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात 'बाप माझा शेतकरी' या कवितेची निवड झाली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. त्यांच्या साहित्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मिनाक्षी नागराळे या एक आदर्श उपक्रम व तंत्रस्नेही शिक्षिका असून त्यांचे उपक्रम व नवोपक्रमांची जिल्हास्तरीय निवड झालेले आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती त्यांनी केलेली आहे. शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक अशा क्षेत्रात मिनाक्षी नागराळे यांनी वाशिम जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आजपर्यंत त्यांना त्यांचे चिमणी पाखरं, उमलती फुले, स्वराज्याचे मावळे, समकालीन समीक्षा अशी चार पुस्तके प्रकाशित झाली असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची निवड शासनाच्या ग्रंथालयाच्या निवड यादीमध्ये समाविष्ट झाले असून याच काव्यसंग्रहाची निवड महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे. आजपर्यंत त्यांचे अनेक वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मिनू
Subscribe to:
Post Comments (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...
No comments:
Post a Comment