त्यागमुर्ती माता रमाई
बनली सा-यांची आई
कष्टाचा खडतर प्रवास
सोसला किती रमाईने त्रास...!!
शेणगोव-या थापुनिया
संसारगाडा हाकला
उपाशी पोटी राहुनिया
फाटका संसार झाकला....!!
बालपणी माय गेली
झाली पोरकी प्रेमाला
संसार नेटाने चालवित
साथ दिली हो भिमाला....!!
दुःखावर दुःख झाले
झेले नियतीचे प्रहार
बॅरिस्टर पदी बघायचे
स्वप्न झाले साकार....!!
बाबासाहेबांच्या स्वागता
लोकं जमले बंदरावरी
काय नेसून मी जाऊ
फाटकी साडी होती घरी...!!
राजश्री शाहू महाराजांनी
दिला फेटा होता घरी
रमा आसवं लपवत
दुःख दाटुनिया येतसे उरी...!!
शेवटी केला विचार मनांत
फेटाच नेसून निघे रमा जोमात
बाबासाहेबांचे कौतुक पाहता
रमा आनंदित झाली जनांत....!!
जीवनभर सोसले कष्ट
झाली रमाची रमाई
विनम्र अभिवादन करते तुज
त्यागमुर्ती माता रमाई....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.9767663257
No comments:
Post a Comment