मन आतुर आतुर
मन आतुर आतुर
तुझ्या भेटीचीच आस
मन आतुर आतुर
तूच माझा श्वास श्वास....!!
मन घायाळ घायाळ
मन घायाळ पक्षिणी
आठवण तुझी येता
येई डोळ्यांतून पाणी.....!!
मन आतुर आतुर
मन उधाण उधाण
तुझ्या कुशी विसावण्या
होई जिवाचं रे रान....!!
मन आतुर आतुर
जिव तुझ्यात गुंतला
आडकाठी येता कुणी
काटा ह्रदयी बोचला...!!
मन पावसाच्या सरी
येतात धुंद लहरी
मन आतुर आतुर
राधा ही तुझी बावरी....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
No comments:
Post a Comment