मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Wednesday, January 21, 2026

शहाणपण थोडे जप पुन्हा

 शहाणपण थोडे जप पुन्हा 

शब्द आहेत अमुल्य वेडे
जपून वापर त्याचा कर पुन्हा 
शब्द असे दुधारी तलवार सये
निर्मळ मनाचा काय गुन्हा....!!

अति महत्त्वकांक्षी होणं 
खरंच चांगले नाही 
तुला मात्र अस्तित्व दाखवण्याची 
फार फार घाई.....!!

लाख मोलाची मायेची माणसं 
परिघात जपून ठेवं पुन्हा 
कोणास ठाऊक कोण कसा विचार करतो
तिथे शब्दांचा काय गुन्हा?

वेळ निघून गेल्यावर कळेल
मग अपराधी वाटेल पुन्हा 
तुझे मन तुलाच विचारेल प्रश्न 
तिथे मग शब्दांचा काय गुन्हा?

अति उतावळेपणा नाही कामाचा
विचार जाब स्वतःला पुन्हा 
जाणवतील तुजला सखे सतत 
आपलेपणाच्या जपलेल्या खुणा....!!

नाही कुणी वेडे इथे 
वेळ प्रत्येकाची येते पुन्हा 
तुझे तु तूलाच विचार ना 
अति महत्त्वकांक्षी हाच गुन्हा 
अति महत्त्वकांक्षी होणं हाच गुन्हा....!!

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे 
वाशिम 

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...