मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, March 21, 2022

मानवता धर्म (अभंग क्र.९)

 *मानवता धर्म (अभंग क्र.९)*


मानवता धर्म | जगी आहे श्रेष्ठ ||

नको निती भ्रष्ट ठेव ध्यानी | १||


पशुपक्ष्यावर | करा सदा प्रेम ||

नाही कधी | नेम माणसाचा || २||


माझे माझे सोड | धर सेवाभाव ||

नाही का रे ठाव | आयुष्याचा ||३||


दया कर सदा | ओळख भुकेला |

ह्या माणुसकीला | जप जरा ४||


नको दुःख देऊ | कोणत्या जीवास |

ठाऊक देवास | असे सारे ५||


जगाची मनाची | ठेव लाज थोडी ||

संसरात गोडी | वाढेलच ||६||


आचार नेटके | संस्कार पेरावे |

तेच उगवावे | नव्या पिढी ||७||


भुकेलेल्या अन्न | तहानल्या पाणी ||

निस्वार्थ भावांनी | सेवा करा ||८||


पुजा मायबाप | कल्याण होईल ||

पुण्य हो मिळेल | आपोआप ||९||


गुरु जगी थोर | आशिर्वाद देती |

गुरूची महती | भुलू नये||१०||


मिनु म्हणे आता | जप मानवता ||

सांगे जाता जाता | जीवनात ||११|||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

गुरूची थोरवी,(अभंग क्र.१०)

 *गुरूची थोरवी(अभंग क्र.१०)*


गुरूची थोरवी | किती रे वर्णावी ||

मुलांना पाजवी | ज्ञानामृत || १||


गुरूचा महिमा | आहे जगी थोर |

वंदी सानथोर | मनोभावे ||२||


गुरूचे आशिष | होईल कल्याण |

आयुष्याची मान | उंच करी ||३||


जीवना आकार | गुरू रोज देती |

माठ घडवती | जणू गुरू ||४||


गुरूमुळे आज | धन्य हे जीवन |

जीवन पावन | जणू झाले ||५||


गुरू आशिर्वाद | यशाचे गमक |

घडवी बालक | गुरू श्रेष्ठ ||६||


गुरूचे महत्त्व | जगी ओळखावे |

सदा लीन व्हावे | गुरूपदी ||७||


गुरूचरणी या | ठेवावे मस्तक |

रक्तात धमक | येईल हो ||८||


हरभरा हो गुरुला | घ्यावी कधी भेट |

जाऊनिया थेट | कधीमधी ||९||


भक्ती शक्ती युक्ती | शिवबाचे गुरू ||

तुकोबांना स्मरू | शिवराय ||१०||


बालपणी गुरू | देतो रे आदर्श |

संस्काराचा स्पर्श | गुरूदेव ||११|


यश फळा येती | अवघड घाट |

गुरूविण वाट | कोण दावी ||१२||


सार जिवनाचे | आद्य गुरू स्मरा |

आनंदाने भरा | क्षण सारे ||१३||


मिनु म्हणे आता | पाया जिवनाचा |

गुरू हा ज्ञानाचा | खरा साथी ||१४||



कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

सोड रे व्यसन (अभंग क्र.११)

 *सोड रे व्यसन (अभंग क्र.११)*


तंबाखू गुटखा | जीवाला चुटका |

कशाला मटका | खेळतोस ||


व्यस्नाच्या आहारी | नको तू जाऊस |

दारूची हाऊस | सोड बाबा ||


नासकी ती दारू | आतड्या सडवी |

तोंडातून शिवी | पडे सदा ||


मावा,गांजा,बिडी | कधी सिगारेट |

कंट्रोल रिमोट | बिघडला ||


अशा व्यस्नापायी | खंगेल शरीर |

होईल कॅन्सर | आपोआप ||


मृत्यूच्या दारात | येईल वरात |

त्राण शरीरात | नसे मग ||


मिळणार नाही | मानवाचा जन्म |

चांगले तू कर्म | ठेव गड्या ||


बोलतो बोबडा | तोंडात तोबरा | 

आवाज घोगरा | येत असे ||


पिचकारी मारी | तोंडात रे पान ||

चोहीकडे घाण | थुंकी असे ||


दारूच्या घोटानं | वाटोळा संसार |

बायकोला मार | कशापायी? ||


आरोग्य तू जप | निरोगी शरीर |

सुख भरपूर | येईल हो ||


मिनु म्हणे आता | सोड रे व्यसन |

स्वत:च्या मनानं | हो शहाणा ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव

वृक्षसंवर्धन (अभंग क्र.१२)

 वृक्षसंवर्धन(अभंग क्र.१२)


वृक्षसंवर्धन | चला रे करूया |

झाडेच लावूया | खूप सारे ||


चला झाडे लावू | झाडे जगवूया |

पाणीही घालूया | सदोदित ||


वृक्षवल्ली आम्हां | सोयरे सकळ |

देत असे फळ | झाडे सदा ||


वृक्षालागवड | आवर्जून करा |

पावसाच्या धारा | येतीलच ||


निसर्गाशी नाते | चला ना जोडूया||

झाडे वाढवूया | खूप खूप ||


शुद्ध हवा देती  | प्राणवायू देती |

फळे फुले देती | सदानंद ||


अनमोल आहे | वृक्षाची सावली ||

ही मायमाऊली | सजीवांची ||


भरपूर पाणी | मंजुळ ती गाणी ||

ऐकू येई कानी | आपोआप ||


आवर्षण टाळू | बदलेल रूप ||

जमिनीची धूप | मिटेल हो ||


पक्ष्यांचा निवारा | फळे फुले मध |

मिळेल औषध | सर्वांसाठी ||


मिनु म्हणे आता | झाडे लावू चला |

माणूस तो भला | जगाचिया ||


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

थोर संत गाडगेबाबा (अभंग क्र.१३)

 *थोर संत गाडगेबाबा(अभंग क्र.१३)*


हाती झाडू घेतं | स्वच्छ गाव केले || 

होऊनिया गेले | थोर संत ||


मूळ नाव डेबू | आई सखुबाई |

मामाघरी राही| डेबू सदा ||


गाव शेणगांव | डेबूजी जन्मले | 

किर्तनी दंगले | डेबू संत ॥


शोधला हा देव | माणसाच्या अंगी |

शिकवण जगी | दिले त्यांनी ॥


अंधश्रद्धा नष्ट | फिरे गावोगांव | 

आदराने नांव | जग घेती ॥


चालतीबोलती। डेबूची ती शाळा ।।

अपंगाला लळा | लावितसे ॥


काढी धर्मशाळा | रंजले गांजले ।

त्यांच्यात शोधले | खरा देव ॥


बोल ते मुखात | मडके हातात 

झाडूने झाडत | फिरे डेबू ||


दगडात देव | शोधू नका कोणी | 

साधीच राहणी | राहतसे ॥


ग्रामस्वच्छता हा | आज अभियान | 

राबवी शासन | गावोगावी ॥


जयंतीदिनी मी | करिते नमन |

कार्य ते महान | डेबुजींचे||


कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे

 ता.जि.वाशिम 

मो. ९७६७६६३२५७

जगण्याची धडपड

 *जगण्याची धडपड*


जगण्याची धडपड

माणसाने हो करावी

कष्ट करूनिया नित्य

आस सत्याची धरावी...!!


खावी कष्टाची भाकरी

रोज घाम रे गाळून

आनंदाने जगायचे

सर्व नियम पाळून.....!!


अर्धी भाकरी वाटावी

ओळखावा हो भुकेला

धाऊनिया जावे कधी

कधी गरिबा हाकेला....!!


विसरून जातिभेद

गावू समतेचे गाणे

झाले गेले विसरून

नका काढू उणेदुणे.....!!


एकदाच मिळतोया

जन्म रे हा मानवाचा

लावा सार्थकी सा-यांनी

धर्म हा माणुसकीचा....!!


कधी करावी हो सेवा

कधी ठेवा मुखी नाम

डोळसपणाने जगा

आत्मविश्वास रे ठाम....!!


मिनू म्हणे आता ऐका

करा एक भले काम

विज्ञानाची साथ धरा

अंधश्रद्धेला हो विराम....!!


लाख येवोत संकटे

कधी ना घाबरायचे

आपल्याच खांद्यावर

आपलेच मग ओझे....!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

मो.९७६७६६३२५७

करा तडजोड (अभंग क्र.१४)

 *करा तडजोड (अभंग क्र.१४)*


करा तडजोड आयुष्यात थोडी

वाढेलच गोडी जीवनात


अपेक्षांचे ओझे ठेवावेत कमी

आनंदाची हमी मिळेल गा


सुखाची भाकर आनंदाने खावी

सुखाची पालवी फुटेल रे


संयमाने वागा करा तडजोड

भागवा रे नड कधी मधी


आयुष्याच्या वाटे अंगी ठेवा शिस्त 

ना कोणाचे हस्त ध्यानी ठेवा


ऐकावे जनाचे करावे मनाचे

सुखी जीवनाचे सुत्र छान


काटकसरही आवर्जून करा

सुखाची घागर भरूयात


स्वप्न जरी मोठे प्रयत्नांनी भरू

साकार हो करु भावी पिढी


करा तडजोड राहू नका दुःखी

जगी तोच सुखी राहिल गा


मिनु म्हणे आता ठेव ध्यानी बोल

कशाला अबोल रहायचे


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम.

९७६७६६३२५७

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...