मिनू
Friday, January 6, 2023
वर्धा येथे होणा-या ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड....
९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे ३,४,५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर वाशिम येथील कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या कवितेची निवड झाली आहे.आखिल भारतीय साहित्य संमेलनात दुस-यांदा त्यांच्या कवितेची निवड झाल्याने वाशिम साहित्य क्षेत्रात हा मानाचा तुरा रोवला आहे..पुर्वी ९२ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या बाप या कवितेची निवड झाली होती...आता वर्धा येथे होणा-या ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर ३/२/२०२३ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळात मिनाक्षी नागराळे यांच्या करू अनांथांची सेवा या अभंगाची निवड झाली आहे.दुस-यांदा आखिल भारतीय साहित्य संमेलनात संधी मिळाल्याने वाशिम जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.त्यामुळे सर्व स्तरातून त्यांवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...्
Thursday, January 5, 2023
नको आत्महत्या (अभंग क्र.३५)
नको आत्महत्या (अभंग प्र.३५)
नको आत्महत्या | ना देह फुकाचा |
विचार मनाचा | ठेव ध्यानी || १||
हिंमतीने रहा | संयमाने वागा |
ह्रदयात जागा | कमवावी ||२||
अविचारी मना | भरकटू नका |
जिवनात चुका | होतातच ||३||
मनातली घाण | काढुनिया टाक |
मनाचाच धाक | असू द्यावा ||४||
कष्टाची भाकर | मेहनत कर |
ओंजळ ती भर | सुखाचिया ||५||
पुन्हा नाही जन्म | अरे मानवाचा |
विचार देहाचा | करा आधी || ६||
आईचे ते कष्ट | सोसुनिया कळा |
जन्म देते बाळा | ठेव ध्यानी ||७||
पुनर्जन्म होई | कैकदा मातेचा |
विसर जिवाचा | पडला का || ८||
सुदैवाने लाभे | जन्म मानवाचा |
खेळ नशिबाचा | नव्हे काही ||९||
मिनू म्हणे आता | हिंमतीने जगा |
उगाचच त्रागा | कुणापायी ||१०||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
Friday, December 30, 2022
Thursday, December 8, 2022
माणुसकी भली (अभंग क्र.३३)
माणुसकी भली (अभंग क्र.३३)
माणुसकी भली| ठेव जरा अंगी|
नाव निघे जगी | सदाचारी ||
विवेक विचार | खरे शिल्पकार |
देतसे आकार | जीवनाला ||
संवेदनशील | असू द्यावे मन |
खरे तेच धन | आयुष्याचे ||
संस्कार सुरेख | घडविते मूल ||
बागेतले फूल | जणू काही ||
सदाचार ठेवा | संस्कृतीचा मेवा |
आईबाप सेवा | खरा धर्म ||
जगात कमव | इभ्रतीला जप |
करूनिया तप | विवेकाने ||
प्राणीमात्रांवर | दया हो करावी |
माणुसकी दावी | जगाचिया ||
दानधर्म करा | अतिथी म्हणून |
देवच मानून | सदाशिव ||
मुखी पांडुरंग | नाम घ्या हरीचे |
कोडे जिवनाचे | सुटेल गा ||
मिनू म्हणे आता | वाचवा हो मुली |
माणुसकी भली | खरोखर ||
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
आनंदाने जगा (अभंग क्र.३२)
जन्म मानवाचा (अभंग क्र.३२)
पुण्याईने मिळे | जन्म मानवाचा |
अर्थ जिवनाचा | कळला का ||
व्यर्थ जाऊ नये | जन्म हा आपुला ||
माणूस तो भला | समजावा ||
किर्तीरूपे झिज | चंदनासमान |
जणू तू सूमन | सुवासिक ||
येईल सुगंध | संस्कार सुरेख |
कर तू पालक | स्वतः चीही ||
जाता जाता थोडे | पुण्य ठेव मागे |
सुखाचे ते धागे | हाती लागे ||
लोभ,राग, द्वेष | दे रे सोडूनिया |
मर्म जाणुनिया | घे माणसा ||
सोबत संगत | चांगली असावी |
छबी ती दिसावी | ईशरूपी ||
चांगले चिंतन | असू दे रे मनी |
सुखाची पर्वणी | तूज मिळे ||
सत्कर्म करावे | कष्ट उपसावे |
प्रेमाने रहावे | जिवनात ||
मिनू म्हणे आता | चांगले ते घ्यावे |
आनंदी रहावे | जिवनात ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
जन्म मानवाचा (अभंग क्र.३१)
जन्म मानवाचा (अभंग क्र.३१)
पुण्याईने मिळे | जन्म मानवाचा |
अर्थ जिवनाचा | कळला का ||
व्यर्थ जाऊ नये | जन्म हा आपुला ||
माणूस तो भला | समजावा ||
किर्तीरूपे झिज | चंदनासमान |
जणू तू सूमन | सुवासिक ||
येईल सुगंध | संस्कार सुरेख |
कर तू पालक | स्वतः चीही ||
जाता जाता थोडे | पुण्य ठेव मागे |
सुखाचे ते धागे | हाती लागे ||
लोभ,राग, द्वेष | दे रे सोडूनिया |
मर्म जाणुनिया | घे माणसा ||
सोबत संगत | चांगली असावी |
छबी ती दिसावी | ईशरूपी ||
चांगले चिंतन | असू दे रे मनी |
सुखाची पर्वणी | तूज मिळे ||
सत्कर्म करावे | कष्ट उपसावे |
प्रेमाने रहावे | जिवनात ||
मिनू म्हणे आता | चांगले ते घ्यावे |
आनंदी रहावे | जिवनात ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
होऊ नये लाचार (अभंग क्र.३०)
*होऊ नये रे लाचार*. (अभंग क्र.३०)
स्वाभिमानी रहा | होऊ नये लाचार |
चांगले आचार | असावेत || १||
अति शिष्टाचार | मती ती खुंटते |
हेवेदावे होते | आपोआप ||२||
कर्म हीच पुजा | सत्य हाच धर्म |
जीवनाचे मर्म | ठेव ध्यानी ||३||
अतिहव्यासाला | पडू नका बळी |
लोभाची ती अळी | वळवळे ||४||
जे आहे त्यातच | समाधानी रहा |
निरखूनी पहा | जिवनाला ||५||
कष्टाची ती फळे | गोड असतात |
सदा पुरतात| आयुष्यात ||६||
मेंदू हा आपला | रहावे सजग |
पहावे ते जग | विवेकाने ||७||
नको फुशारकी | बाप जिवावर |
उभा पायावर | दाखव गा ||८||
सत्याची ती कास | सोडू नको कधी |
विचार हा आधी | करावेच ||९||
लाचार आयुष्य | तू दे गा सोडून |
कंबर कसून | सज्ज रहा ||१०||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो. ९७६७६६३२५७
Subscribe to:
Posts (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...








