मिनू
Thursday, March 7, 2024
तूच आहेस नारी...(जागतिक महिला दिनानिमित्त मुक्तछंद काव्य)
Wednesday, March 6, 2024
शिवकाव्य...
विषय-शिवकाव्य*
छत्रपती शिवाजीचा
जन्म झाला शिवनेरी
सन सोळाशे हो तीस
एकोणीस फेब्रुवारी....
शिवछत्रपती राजा
थोर जिजाऊ माऊली
संस्काराचा लेप लावी
शिवबाची हो सावली...
कुशीतून उगवला
तळपता वीर तारा
फुटे घाम शत्रूलाही
नाही शत्रूसही थारा...
रामकृष्ण गोष्टी छान
सांगतसे जिजामाता
न्याय अन्याय शिकवू
जगी श्रेष्ठ वीरमाता....
युध्दनिती शिकवली
हाती दिली तलवार
बालपणी थरारली
तळपती तलवार....
कर तलवारबाजी
सपासप वार कर
घोड्यावर स्वार होऊ
चढू लागे झाडावर....
दांडपट्टा फिरू लागे
लांब जाई भालाफेक
एक एक धडा घेई
माय जिजाऊचा लेक...
स्वराज्याचं स्वप्न पाही
राजमाता जिजाबाई
शूरवीर पुरूषांच्या
नांवे गाजे जिजाआई...
स्वराज्याची हो प्रतिज्ञा
रायरेश्वरात घेई
मुठभर मावळ्यांना
धडे स्वराज्याचे देई....
शत्रू घाबरत असे
नांव ऐकता शिवाजी
वीर मावळे सगळे
लावी जिवाचीच बाजी...
अफजलखाने वीडा
शिवाजीचा उचलला
शिवबाने कोथळाच
वाघनखे ने फाडला...
कोसळला शत्रू खान
उडे शत्रू दाणादाण
शाहिस्तेखानच जाई
घेण्या शिवबाची जान...
बोटे कापली खानाची
झोपेतही बडबडे
धाक खावून शिवाचा
शाहिस्तेखानच रडे....
पेटा-यात बसूनहो
गेले होते शिवराय
तुरी दिल्या हातावर
निसटले शिवराय...
एक एक गड घेत
युध्द करत शिवाजी
स्वराज्यासाठीच सारी
बाजी लावी हो तानाजी....
गड आला पण सिंह
धारातिर्थी रे पडला
एक एक मावळ्याने
इतिहास घडवला.....
सिद्दी पाठलाग करी
वेळ आली आणिबाणी
शिवाजीची घालमेल
बाजीप्रभु ओळखली....
खिंड बाजीने लढली
पाहुनच स्वामीभक्ती
आले भरून मन रे
कांही चालेना हो शक्ती...
स्वराज्याचे ध्येय होते
शिवाजीला गाठायचे
जिवावर आले होते
बाजीप्रभु सोडायचे....
सुरू झाली लगेचच
झुंज खिंडीत शर्थीची
पराक्रमी बाजीप्रभु
झाली कोंडी हो शत्रूची...
शत्रूचीही घामाघूम
घोडखिंड लढवली
झाली पावनखिंड हो
तोफ मग कडाडली....
स्वामीभक्त बाजीप्रभु
धारातिर्थी कोसळला
इतिहास मावळ्यांनी
शिवबाच्या घडविला.....
राजधानी रायगड
एक अपूर्व सोहळा
शिवबाच्या राज्यासाठी
लढे एकेक मावळा.....
सर्व धर्मांना, प्रजेला
न्याय व सुख देणारा
स्वराज्याचे स्वप्नासाठी
पुर्णपणे झटणारा....
असा शूरवीर राजा
होता न्यायी दिलदार
भल्याभल्या शत्रूनींही
होती घेतली माघार....
माझा जाणता राज्याचा
भरे छान दरबार
स्वराज्याचं स्वप्न पाही
घुमे जयजयकार....
महाराष्ट्र दैवत मानते
करी मानाचा मुजरा
शिवजयंतीचा सण
चला करू हो साजरा....
*कवयित्री-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
Saturday, March 2, 2024
भावना (निरजा काव्य प्रकार)
निरजा स्पर्धेसाठी
विषय -भावना
मानवी मन असावे
सदा संवेदनशील
उदात्त
भावना
त्याग, समर्पण
द्वेष उरी नसावे.....१
अनाथांस प्रेम द्यावे
आपुलकी जिव्हाळा
स्नेह
आधार
सदा देवून
पुण्य पदरी घ्यावे....२
मातापित्यांची सेवा करा
जन्मदाते,पालनहार
गुरू
आधारस्तंभ
येईल जीवनास
तेंव्हाच अर्थ खरा......३
माणुसकी खरा धर्म
जातीभेद नको
भावना
सहानुभूती
काळजातून जपावी
जीवनाचे खरे मर्म ...४
स्त्रीभ्रृणहत्या मोठे पाप
वंशाचा दिवा
वारीस
कूळ
खोटी प्रतिष्ठा
जपण्या पाप अमाप .....५
कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मु.पो.कोकलगाव
पीन ४४४५०५
मो.९७६७६६३२५७
Saturday, February 24, 2024
मन आतुर आतुर
मन आतुर आतुर
मन आतुर आतुर
तुझ्या भेटीचीच आस
मन आतुर आतुर
तूच माझा श्वास श्वास....!!
मन घायाळ घायाळ
मन घायाळ पक्षिणी
आठवण तुझी येता
येई डोळ्यांतून पाणी.....!!
मन आतुर आतुर
मन उधाण उधाण
तुझ्या कुशी विसावण्या
होई जिवाचं रे रान....!!
मन आतुर आतुर
जिव तुझ्यात गुंतला
आडकाठी येता कुणी
काटा ह्रदयी बोचला...!!
मन पावसाच्या सरी
येतात धुंद लहरी
मन आतुर आतुर
राधा ही तुझी बावरी....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
Thursday, February 22, 2024
कधीतरी शिवबासारखं होऊन बघ... शिवजयंती निमित्त वाशिम येथे कविसंमेलनात मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेचे सादरीकरण...
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...

