संकटात सदा | हिंमत असावी|
भितीही नसावी | कशाचीही ||
जिद्द हो असावी | अभ्यासाचा ध्यास |
सुखाचा प्रवास | होईल गा ||
नको हार मानू | खचू नको कधी
संकट रे मधी | येतातच ||
अपयश हीच | यशाची पायरी |
ध्येय ठेव उरी | जिवनात
खूणगाठ बांध | निश्चयाने दृढ |
यशाचे ते गूढ | ठेव ध्यानी ||
आळस हा वैरी |आहे माणसाचा |
बदल हा ढाचा | आयुष्याचा ||
मेहनत कर | अभ्यास करावा |
पर्वत गाठावा | यशाचा हो ||
मनन चिंतन | करीत जा थोडे |
आयुष्याचे कोडे | सुटेल गा ||
तनमनधन | द्यावे ना झोकून |
हळूच वाकून | यश येईल ||
यशाची पायरी | गाठायची आहे
खस्ता खात राहे | जीवनात |
जिद्द हो असावी | मानू नये हार |
जिवनाचे सारं | मिनू म्हणे ||
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७
No comments:
Post a Comment