मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, February 24, 2024

मन आतुर आतुर

 मन आतुर आतुर


मन आतुर आतुर

तुझ्या भेटीचीच आस

मन आतुर आतुर

तूच माझा श्वास श्वास....!!


मन घायाळ घायाळ

मन घायाळ पक्षिणी

आठवण तुझी येता

येई डोळ्यांतून पाणी.....!!


मन आतुर आतुर 

मन उधाण उधाण

तुझ्या कुशी विसावण्या

होई जिवाचं रे रान....!!


मन आतुर आतुर

जिव तुझ्यात गुंतला 

आडकाठी येता कुणी

काटा ह्रदयी बोचला...!!


मन पावसाच्या सरी

येतात धुंद लहरी

मन आतुर आतुर

राधा ही तुझी बावरी....!!


कवयित्री

मिनाक्षी पांडुरंग नागराळे

ता.जि.वाशिम.

Thursday, February 22, 2024

कधीतरी शिवबासारखं होऊन बघ... शिवजयंती निमित्त वाशिम येथे कविसंमेलनात मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेचे सादरीकरण...

 कधीतरी शिवबासारखं होऊन बघ


कधीतरी माझ्या शिवबासारखं होऊन बघ
स्वतःसाठी नाही तर दुस-यासाठी जगून बघं‌...,!!धृ!!

जुलमी सत्तांवर कधी वार करून बघ
अन्यायावर कधी प्रहार करून बघ
सत्तेपायी स्वाभिमान गहाण न ठेवता
कधी अभिमानाने जगून बघ....!! १!!

रयतेच्या कल्याणासाठी, हितासाठी 
शिवबाचे विचार मनात पेरून बघ
लाचारी, भ्रष्टाचारी, घुसखोरी सोडून बघ
करता आलं तर कधी चांगल काम करून बघ...!! २!!

प्रत्येक स्त्री मातेसमान म्हणून बघं
एखाद्या स्त्रीचा पाठीराखा होऊन बघं
एखाद्याला अभय देऊन बघं
स्वार्थासाठी तर सारेच जगतात
कधी इतरांसाठी जगून बघं.....!!३!!

इतकं सोप्पं ही नाही लढाया करणं
शत्रूची दाणादाण उडवणं
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी
शेतकऱ्यांची ढाल बनून बघं...!!४!!

खाजगीकरणांचं गवत
आज जोरजोरात फोफावत आहे
तलवार घेऊन युद्ध करायचं नाहीय
हातातल्या लेखणीची तू तलवार करून बघं...!!५!!

कशी होती शिवकालीन प्रजा
आज कुठं चाललाय महाराष्ट्र माझा?
अठरा पगड जातीजातीला एकत्र घेऊन बघ
शाहु फुले आंबेडकरांचे विचार पेरून बघं...!!६!!

अच्छे दिन अच्छे दिन खूप बघितले
रयतेच्या सुखाचं हिताचं राज्य आहे का ठरवून बघ
समतेचं,रयतेचं, संविधानाचं,लोकहिताचं
लोकशाहीचं राज्य निर्माण करून बघं...!!७!!

बस झालं वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे उचलणं तरूणा
कधीतरी आता डोक्यानं विचार करून बघं
न्यायाच़, हक्काचे,समानतेचं,समतेचं
लोकशाहीचं राज्य निर्माण करून बघं...!!८!!

गोवा तर सारेच फिरून येतात
कधी गडकिल्ले चढून बघं
नाही शिवबा होता आलं तरी हरकत नाही
पण शिवरांयांचे विचार नसानसांत पेरून बघं...!!९!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

Wednesday, February 7, 2024

त्यागमुर्ती माता रमाई.... जयंतीनिमित्त मिनुची कविता..

 त्यागमुर्ती माता रमाई

त्यागमुर्ती माता रमाई
बनली सा-यांची आई
कष्टाचा खडतर प्रवास
सोसला किती रमाईने त्रास...!!

शेणगोव-या थापुनिया
संसारगाडा हाकला
उपाशी पोटी राहुनिया
फाटका संसार झाकला....!!

बालपणी माय गेली
झाली  पोरकी प्रेमाला
संसार नेटाने चालवित
साथ दिली हो भिमाला....!!

दुःखावर दुःख झाले
झेले नियतीचे प्रहार
बॅरिस्टर पदी बघायचे
स्वप्न झाले साकार....!!

बाबासाहेबांच्या स्वागता
लोकं जमले बंदरावरी
काय नेसून मी जाऊ
फाटकी साडी होती घरी...!!

राजश्री शाहू महाराजांनी
दिला फेटा होता घरी
रमा आसवं लपवत
दुःख दाटुनिया येतसे उरी...!!

शेवटी केला विचार मनांत
फेटाच नेसून निघे रमा जोमात
बाबासाहेबांचे कौतुक पाहता
रमा आनंदित झाली जनांत....!!

जीवनभर सोसले कष्ट
झाली रमाची रमाई
विनम्र अभिवादन करते तुज 
त्यागमुर्ती माता रमाई....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Wednesday, January 31, 2024

मन्या (प्रेरणादायी कथा)

 मन्या (कथा)

     मन्या लहानपणापासूनच खूप हुशार मुलगा होता पण परिस्थिती जेमतेम बेताचीच होती. मनाचा बाप मात्र ट्रक ड्रायव्हर असल्याने आठ-आठ दिवस,कधी पंधरा दिवस घरी यायचा नाही. दहा गावचा पाहुणा असल्यासारखा जिकडे रस्ता वळेल तिकडेच जाणारा. जेंव्हा  मन्याचा बाप ट्रक वरून उतरून घरी आला की मन्याच्या मायेची काही सोय नसायची. मनाचा बाप मनाच्या माईला दारू पिऊन खूप भयानक बदडून काढायचा. मन्याचा बाप संतू मारायला लागला की मन्याची माय मन्याला आणि गण्याला ओढायची.उठा रे बाबांनो बाहेर पळून जावा नाहीतर हा शैतान तुम्हाला पण हाताखालून काढल बघा.तुमच्यावर पण हात थंड करून घेईल अशी मोठमोठ्याने हाक द्यायची. मन्या आणि गण्या दोघेही लहानच होते. मन्याला बाप संतूची फार भीती वाटायची. मन्याला आता हळूहळू कळू लागलं होतं की हे बापाचं असं वागणं चुकतंय त्यांना सांगणार तरी कसं ? एक दिवस मन्या खूप डेरिंग करून बापाला विचारतो की आबा तुमचा विचार काय आहे ? आम्हाला जगू देणार आहेत की नाही? तेंव्हा दारू पिऊन फुल्ल झालेल्या बाप संतोष म्हणाला. तुझ्या आवडीचा केक आणतो म्हणून बाहेर जाऊन दारूच्या दुकानात जाऊन खूप दारू पिऊन संतोष झुकतच आला.संतोष झुकत रस्त्याने पडत. पुन्हा उठत पुन्हा झुके खात खात घरी येतो. तशी मन्याची माय ज्योती 'अरे माझ्या कर्मा ' " माझच नशीब फुटकं ग बया" अशा दलिंदराच्या गळ्यात पडले मी म्हणून जिवाचा त्रास करून रस्त्यावर नाल्यात पडलेल्या मन्याला उठवून घरी आणण्याचा प्रयत्न करते. एकटीला मन्याचा बाप उचलत नाही मन्या घरात मोठा असल्याने मनाला थोडेफार कळत होतं.आईचा आवाज आहे म्हणत मन्या लगबगीने अनवाणी पायानेच पळाला रात्रीची वेळ होती. रात्रीचा रातकिड्यांची किर्र किर्र ऐकू येत होती. सगळी गल्ली शांत झोपली होती. रात्रीचे बारा वाजले होते.दोघं मायलेकरं कसंतरी  नशेत धुंद झालेल्या संतोषला घरी आणून झोपवतात.
      मन्याला वडिलांचा खूप राग आला होता. तो आईला म्हणाला " आई यापुढे आपण बाबाला घरी आणायचं नाही." बघ पडू दे. मरू दे . मन्याच्या माय म्हणाली "अरे देवा ! असं कसं म्हणतोस रे लेकरा?  तो तुमचा बाप आहे. कसा बी असला तरी बापाचं छप्पर डोक्यावर नसलं ना की दुनिया सगळी भकासच दिसती रे राजा". माझ्या कपाळाचं कुंकू आहे. मला तर जपलेच पाहिजे. मन्याला खूप भूक लागली होती पण तो उपाशीच झोपला. ज्योतीने पण काही खाल्लं नव्हतं. अतिशय नाजूक परिस्थिती असलेल्या ज्योतीला काही केलं तरी झोप येत नव्हती. या आडंगावरून त्या आडंगावर कूस बदलत होती. आपलं कसं होईल ? आपल्या लेकरा बाळाचं कसं होईल? असं ज्योतीला नेहमी वाटत होतं. विचार करता करता ज्योतीला कधी डोळा लागला कळालच नाही. पहाटे पहाटे  थंडीने अंग कुडकुडत होतं. सारं अंग बोध पडलं होतं. जो तिला पहाटेच जाग आली तशी ज्योती उठली आणि घरातलं पांघरून आणून मन्याच्या बापाच्या अंगावर आणि मन्याच्या अंगावर एक चादर टाकलं निष्पा मनाकडे ज्योती एकटच पाहू लागले मनाशीच विचार केलं माझं लेकरू किती हुशार आहे शाळेत पण पहिला नंबर जर वर्षी येतोय काही झालं तरी चालेल पण मी माझ्या लेकराला शिकवणारच त्याला मोठा साहेब बनवणार असं म्हणून मन्याचे माय पहाटेच कामाला लागले.
         इतक्यात म्हशीचा आवाज आला फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी ज्योतीने तिच्या बापाकडून एकमेव भांडली होती. तिच्या दुधावरच कसतरी तेल मीठ भागत होतं.दोन्ही पोरांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसायचा म्हणून ज्योती लोकांच्या शेतात रोजाने कामाला जायची जो काही रोजगार यायचा त्यातच मुलांचं व घरचा खर्च भागवायची.तिच्या अंगावर छिद्र पडलेली साडी असायची. एक मंगळसूत्रा शिवाय ज्योतीच्या गळ्यात काहीच नव्हतं.तो नेहमी आपल्या फटक्या नशिबाला दोष देत द्यायची कारण चुकीचं लग्न झालं होतं तेंव्हा .तिचा नवरा संतोष अजिबात दारू पीत नव्हता नंतर जसा तो ट्रकवर जाऊ लागला तशी त्याला कधी सवय लागली ते कळालेच नाही.
      एके दिवशी संतोष ट्रक वरून उतरला. त्या दिवशी रात्री पुन्हा फुल्ल दारू पिऊन झोपतच घरी आला जो तिला खूप वाईट वाटलं आपण इतकं कापड कष्ट लोकांच्या शेतात जाऊन करतोय पण त्याला तर लेकरांचं पण काही घेणं देणं नाही आणि हा सगळा पैसा दारूत गमावून बसतोय म्हणून ज्योती संतोषला खूप मोठमोठ्याने बोलू लागली. त्यांच्या भांडणामुळे गल्लीतल्या लोकांना झोप येत नव्हती. इतकी बडबड संतोष आणि ज्योती करू लागले. संतोष उठला आणि घरातलं दाव सोडलं आणि ते दावं चार पदरी करून बायकोला जोरजोरात मारायला लागला. ज्योती मोठमोठ्याने वाचवा वाचवा..." मेले ग माय माय. अरे देवा! असं म्हणत मोठ्या आकांताने टाहो फोडत होती. गल्लीतले सगळे लोक मन्याच्या  घराकडे पळत आले. आणि जमा झाले .बघतात तर घराचे दार आतून  पक्के लावलेले. गल्लीतल्या सर्व बाया- माणसांनी दार उघडण्याची विनंती केली पण संतोष काही केल्या दार उघडत नव्हता. झोपेत असलेला मन्या अचानक झोपेतून उठून जागी झाला आणि बापाच्या अंगावर पडून थांबवण्याचा प्रयत्न केला. मन्याच्या आवाजाने गण्या पण उठून बसतो दोघ भाऊ मिळून बापाचा हात धरून थांबवतात . मन्याला बापाच्या हातातली ती दोरी कुठून घेऊन म्हशीच्या गोठ्यात फेकून देतो असं झालं होतं.दोन्ही लेकरं ज्योतीच्या गळ्याला पडून जोर जोरात रडायला लागतात. ज्योतीचा चेहरा मार खाऊन खाऊन पार सुकून गेला होता. मनानं त्या दिवशी मनाशी खूणगाठ शिकूनगट बांधली होती. की बस आता आपण मागे राहायचं नाही खूप अभ्यास करायचा आणि एक दिवस स्वतःच्याच पायावर उभे राहून दाखवायचं असा निश्चय देत मन्या पुढं आला. मन्या त्या  दिवशी चटकन उठून हातात पुस्तके घेऊन अभ्यासाला बसला. मन्याच्या शेजारी सुरेखा मॅडम राहत होत्या. त्या मनाला नेहमी सांगायच्या " मनोज तू खूप अभ्यास कर .तू ही सगळी परिस्थिती बदलू शकतोस. तसा मन्याने मान हलवली हो मॅडम म्हणाला आणि काही चुकलं किंवा समजत नसलं तर ते मला तू विचारू शकतोस असं म्हणून मॅडम मॅढमच्या च्या घरी निघून गेल्या.
         मन्या खूप मन लावून अभ्यास करू लागला. मन्या दररोज शाळेत जायचा. एकही दिवस शाळा बुडीत करीत नसायचा पण मन्याच्या लहान भावाला गणूला मात्र म्हशी घेऊन ती चरायला न्यायला लागायची . गणूची शाळा बुडत पडायची. गणू हळूहळू अभ्यासात मागे पडू लागला. मन्याला खूप छान वाटायचं. दोन्ही पण खूप अभ्यास केला . समस्त गावगरी नी एक करावं आणि पण त्याला परिस्थिती आडवी येत होती. गरिबीमुळे दोघांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नव्हता आणि म्हशीमुळे कसेतरी घर खर्च भागवत होता त्यामुळे गणूला इच्छा असूनही म्हैस घेऊन जावं लागत होतं
         एके दिवशी सुरेखा मॅडमने मन्याला आवाज दिला म्हणून " इकडे ये§  हो हो आलो.असं मॅडम म्हणत.मन्या पळतच मॅडम कडे आला धापा टाकीत   देत म्हणाला. काय काम आहे मॅडम ? होणाऱ्या अरे बाबा माझं काहीच काम नाही. बस खाली मग सांगते मॅडमने म्हणाल्या. खायला पेढा देत म्हणाल्या " हे बघ मनोज उद्या स्कॉलरशिप चा पेपर चा फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे तू परीक्षेला बस आपण उद्याच फॉर्म भरून घेऊ मन्या म्हणाला हो मॅडम पण मॅडम माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीत त्यावर मॅडम म्हणाल्या त्याची चिंता तू करू नकोस मी तुझे पैसे भरून फक्त तू स्कॉलरशिप चा फॉर्म भरायला उद्याला ये तसं तुझ्या शिक्षकांना सांग त्यावर मन्या हो म्हणाला आणि पेढा तोंडात टाकीत पळत सुटला मॅडमने दुसऱ्या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मनाला पैसे दिले आणि मनाचा शिष्यवृत्ती नवोदय साठी फॉर्म भरला गेला.
       सकाळ होतास मन्याने मॅडमचा विषय आईला सांगितला आईनेही मॅडमची लय उकार आहेत रे बाबा !तरी बाबा आपल्यावर असं म्हणत म्हणून कृतक्षता  केली .मन्या खूप अभ्यास करू लागला. मॅडमने मनोजला वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी झाली आणि मन्याने शिष्यवृत्ती परीक्षा दिली . त्या दिवशी परीक्षेला जाण्यापूर्वी मन्याने आईचा व मॅडमचा आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेला . खूप मन लावून अभ्यास केला आणि खूप मन लावून पेपर सोडवित होतो. पेपर खूप छान गेले आणि मनाचा नवोदयला नंबर लागला . एके दिवशी अचानक गल्लीतली पोरं मन्याच्या पेपरात आलेला फोटो घेऊन पळत घुळगाच्या घोळका मन्याकडे आले आणि मनाला उचलून घेत नाचू लागले मन्यावर बनवून गेला काय झालं ते कळायलाच नव्हतं. तेवढ्यात मॅडम तिथं आले आणि शाबाश मनोज म्हणून मनोजला पेढा खाऊ घातल्या. मॅडम म्हणाल्या मनोज तू खूप चांगला  आहेस.चांगल्या गुणवत्ता चांगल्या गुणांनी नवोदयची परीक्षा पास झाला आहे. राज्यात तुझा पहिला नंबर आला आहे . म्हणायला खूप आनंद झाला मनाचे व त्याच्या आईची नजरा नजर झाली तेव्हा त्या दोघा मायलेकरांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रू होऊ लागले मन्याने आईला घट्ट मिठी मारली. लेकाने मारलेल्या मिठी मुळे आईचं काळीज फार आनंदन गेलो होतो नवऱ्याने मारलेल्या वरणाचा तिला आता विसर पडत होता मना खूप जोमाने अभ्यासाला लागला आणि दहावी बारावीला शाळेत पहिला आला मन्याने अॲग्रीसाठी फॉर्म भरला पण पुढे काय करावे हे त्याला कळत नव्हते अँग्रीला नंबर लागला. आता शिक्षणात शिक्षणाचा खर्च वाढला होता पण मन्याच्या आईने धीर सोडला नाही खूप मेहनत करून काम करून पैसे जमा करून मनाच्या शिक्षणासाठी एक एक पैसा ज्योती पुरवू लागली. बघता बघता मन्याचा ॲग्री पण पूर्ण झाला. आता नोकरी नाही. पुढे काय करावे?  हे काहीच कळेनासं झालं. तेंव्हा मन्या पुढे जोमानं एमपीएससी यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला. पूर्व परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास होत.मनापासून यांनी खूप अभ्यास केला. जीव तोडून केला आणि स्पर्धा परीक्षांचा निकाल लागला. मन्या चांगल्या गुणांनी पास झाला एका बेवड्या दारुड्या माणसाचा मुलगा पीएसआय झाला मन्या चा पीएसआय मनोज कुमार साहेब झाला सर्व वृत्तपत्रांनी दखल घेत मनोज च्या बातम्या छापून पेपरला आल्या. गल्लीतल्या सर्व बायकांनी मनोजचा आदर सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांनी सर्वच मनाच्या सर्व मित्रांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
       ज्या दिवशी मन्या गावात आला त्या दिवशी गावातल्या सगळ्या लोकांनी गुलाल उधळत म्हणायला"  अंगा खांद्यावर घेत वाजत गाजत गावात मिरवणूक काढली. गल्लीतल्या सगळ्या बायका म्हणायला औक्षण करण्यासाठी ताट घेऊन गर्दी करत होत्या. मन्याची आईला बघीन पुढे आली मन्याच्या गळ्यात हार गच्च भरलेले होते. तोंड सगळं बोलायला.इकडे  माकडं  होतं. मन्याच्या आईला म्हणायला बघून हुंदका आवरत नव्हता म्हणून यांनी आईला घट्ट मिठी मारली. म्हणून याच्या आईने मनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कुरवाळले आणि मनोमन माझा साहेब ग माय म्हणत मनाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत मनाला आशीर्वाद दिला आणि घट्ट मिठी मारली. आनंदाश्रूना मोकळी वाट करून दिली. गल्लीतल्या सगळ्या बायकांचा उर भरून आला. त्यातल्या छबा काकू म्हणाल्या " माय बाई . ज्योतीच्या जीवनाचे  आज सार्थक झालं लेकरं चांगलं निघाली.लेकानं नांव केलं बाई!

मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो 9767663257

Friday, December 15, 2023

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण...वाशिम

 








अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण वाशिम येथे उत्साहात संपन्न...

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...