महेश देवळे सर एक उत्तम सूत्रसंचालन करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य करत आपल्या मधुर वाणीतून प्रेक्षकांचे मन जिंकणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वाशिम नगरीतल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा सरांनी आयोजित केला होता.
आजच्या आधुनिक युगात, मॉडर्न युगात वाढदिवस म्हणले की केक, हार,फुगे,हॉटेल्स बुक करणे, फटाक्यांची अतिशबाजी वगैरे वगैरे मोठ्या धुमधडाक्यांनी साजरे केले जातात. पण या सगळ्या विचारांना फाटा देत राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नसानसात भिनलेले श्री.महेश देवळे सरांनी मुलींचे फक्त नांवच जिजाऊ न ठेवता जिजाऊंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले ते म्हणजे त्यांची कन्या तिचे नाव सरांनी जिजाऊ ठेवले. फक्त नावच नाही तर पुरोगामी विचारांना फाटा देत नामकरण सोहळा आयोजित केला या सोहळ्याची सुरुवात सुरसंगीत जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सुरेखाताई आरू (विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख उपस्थिती सौ. अन्नपूर्णाताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा) होत्या.जिजाऊ वंदना झाल्यानंतर महेश देवळे सरांच्या मुलींचा म्हणजे कु.जिजाऊ महेश देवळे हिचा नामकरण करण्यात आले...त्यानंतर पाळणा गायनासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या भगिणी यांनी जिजाऊ पाळणा गायला ...सुगमसंगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच जिजाऊ वंदना सौ सुनिता कढणे,वैशाली बुंधे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. जिजाऊं वंदना झाल्यानंतर जिजाऊंची रांगोळी अतिशय सुंदर कु.सदिच्छा दत्ता वरखडे यांनी अप्रतिम सुंदर रांगोळी मॉंसाहेब जिजाऊ यांची काढली तर संचालन कु. माधुरी बहादुरे यांनी केले.
छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार फक्त सांगून किंवा ऐकून गप्प न बसता प्रत्यक्ष कृतीतून उतरावत श्री महेश देवळे सर यांनी ' न भूतो न भविष्यती ' असा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन तो समाजसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.तो म्हणजे वाशिम नगरीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. यामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य व साहित्य अशा विविध क्षेत्रातील एकूण दहा महिलांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह शाल देऊन जुनी आयुडीपी मध्ये करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण व साहित्य यामध्ये मीनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका तसेच उपक्रमशील शिक्षिका व साहित्यिक कवयित्री शिक्षिका ), राजकारण सौ. अन्नपूर्णा ताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष) व सौ पूजा विनोद खंडेलवाल (लोकप्रतिनिधी) आरोग्य- डॉक्टर वैशाली चौधरी व डॉक्टर अर्चनाताई रेघाटे (रुग्णसेवा ), समाजकारण- सो सुरेखाताई आरू सौ. सविताताई बोरकर (जिजाऊ ब्रिगेड वाशिमच्या जिल्हाध्यक्ष) साहित्य - सौ मधुरानी बनसोड (साहित्य )तसेच नवोदित लेखिका-ज्योतीताई देशमुख अशा सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळा व वाढदिवसानिमित्त महिलांचा गुणगौरव करण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे विचारच नाहीत तर माणसाचं मन,मनगट,मेंदू सशक्त असावं लागतं इतकंच नाही तर मनही मोठं असावं लागतं. अशा या महेश देवळे सरांच्या कार्याला मानाचा मुजरा... समाजातील लोकांनी सरांचा आदर्श घ्यावा असाच कार्यक्रम महेश देवळे सरांनी केला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
लेखिका, कवयित्री समिक्षिका,शिक्षिका,संपादिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम